पंढरपूर

छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुभोभीकरणाचे रखडलेले काम लवकरात लवकर करावे शिवक्रांती युवा संघटनेची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुभोभीकरणाचे रखडलेले काम लवकरात लवकर करावे अशी मागणी शिवक्रांती युवा संघटनेने केली

पंढरपूर प्रतिनिधी रफिक आतार
पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी #महाराज यांच्या स्मारकाच्या सुशोभीकरणाचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करणेबाबत शिवक्रांती संघटनेच्या वतीने मुख्याधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले….
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या सुशोभीकरनाचे काम काही वर्षांपूर्वी पंढरपूर नगरपालिकेने हाती घेतले होते,
पण पालिकेच्या निष्काळजीपणा मुळे व दुर्लक्षेमुळे हे स्मारकाचे काम अर्धवट अवस्थेत पडलेले आहे,
पालिकेने स्मारकाचे काम सुरू करून अनेक वर्ष उलटली तरीही स्मारकातिल अनेक कामे अद्यापही अपूर्ण अवस्थेतच आहेत.
शिवजयंती सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने स्मारकातील अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करावीत,,,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातली रखडलेली कामे पुढीलप्रमाणे…
1) स्मारकामध्ये हायड्रोलिक सीडी लवकरात लवकर बसवण्यात यावी,,
2) छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला बाहेरून रंगकाम,,
3)संपूर्ण स्मारकाला विद्युत रोषणाई करणे,.
4) स्मारकामध्ये रक्तचंदनाचा महादरवाजा बसवण्यात द्यावा,
5) स्मारकामध्ये अंडरग्राउंड लाईट स्वतंत्र वीज बोर्ड बसवण्यात यावा..
6) छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास रंगकाम,
व इतर स्मारकातील अर्धवट अपूर्ण कामे येत्या 20 जानेवारीपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्यात यावी अन्यथा 26 जानेवारीपासून शिवक्रांती संघटना नगरपालिके समोर अमरण उपोषण करेल यांची पालिका प्रशासनाने नोंद घ्यावी अश्या विषाचे निवेदन आज पंढरपूर शहराचे मुख्याधिकारी यांना भेटून चर्चा करून देण्यात आले,,
या वेळी शिवक्रांती संघटनेचे शहराध्यक्ष सागर चव्हाण,मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष रामभाऊ गायकवाड, धाडसचे अध्यक्ष संदीप मुटकुळे, नगरसेवक किरण घाडगे,सोपान
काका देशमुख, निलेश गनथाडे पाटील,सागर बडवे,निलेश कोरके, विकी झेंड,मधुकर फलटनकर, संदिप शिंदे,सागर बडवे,कृष्णा कवडे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button