चिमूर विकास आढावा सभा
आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी काही अधिकाऱ्यांना धारेवर धरले
चिमूर तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके
चिमूर तालुक्यातील विकास कामे सुरू असताना ठप्प होती परंतु काही अधिकारी हे कामचुकार करीत असल्याचे आढळले असताना त्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे सांगत
आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी नागरिकांनी दिलेल्या तक्रारी तात्काळ सोडविण्याच्या सूचना देत दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिले असल्याचे सांगत या पुढे जनतेची कामे लवकर सुटणार असल्याची ग्वाही दिली.
आढावा सभेत वसंत वारजूकर ,विवेक कापसे, डॉ श्यामजी हटवादे, मनिष तुंम्प्लिवार बकाराम मालोदे पस सदस्य अजहर शेख पस सदस्य प्रदीप कामडी जीप सदस्य मनोज मामीडवार कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कलिम शेख ,ग्राम पंचायत सदस्य संदीप पिसे भाजप शहर अध्यक्ष सचिन फरकाडे राजू देवतळे संजय कुंभारे भिसी तहसीलदार पाटील, जीप बाधकाम उपविभागीय अभियंता भास्कर मोडक सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता सोनवाल शाखा अभियंता बांबोडे चिमूर ठाणेदार स्वप्नील धुळे कृषी कार्यालय कृषिधिकारी सूर्यवंशी तसेच नप गट नेत्या छाया कनचलवार वर्षा शेंडे ज्योती ठाकरे आदी अधिकारी उपस्थित होते.
या सभेत नागरिकासोबत सरपंच ,उपसरपंच व पस सदस्यांनी सुद्धा प्रश्न विचारले तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी ते प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सुद्धा आश्वासन दिले .दरम्यान शंकरपूर येथील दारू बंदी समिती च्या महिलांनी शंकरपूर येथील खुलेआम दारू विक्री संदर्भात आमदार बंटीभाऊ भांगडीया यांना निवेदन दिले असता दारू बंदी समिती ला शंकरपूर ग्राम पंचायत ना हरकत ठराव देत नसल्याचा प्रश्न उपस्थित केला असता बीडीओ पुरी यांनी तसा नाहरकत ठराव देण्याची सूचना केली
या आढावा सभेत उपविभागीय अधिकारी संकपाळ महसूल कार्यालय, पोलीस स्टेशन , सिंचाई ,ग्रामीण पाणी पुरवठा , जीप बांधकाम, सार्वजनिक बांधकाम, विद्युत मंडळ, कृषी कार्यालय आदी शासकीय अधिकारी उपस्थित होते .
दरम्यान एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी हे उपस्थित नव्हते परंतु त्यांचे प्रतिनिधी यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने प्रकल्प अधिकारी यांना नोटीस देण्याचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी तहसीलदार यांना सूचना केली .
आढावा सभेचे संचालन व आभार तहसीलदार पाटील यांनी केले तालुक्यातील सरपंच उपसरपंच व नागरिक उपस्थित होते .






