अमळनेर मुंदडा नगरमधील संत गजानन महाराज महीला वारी निघाली शेगांवला
अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर येथील संत गजानन महाराज संस्थान मुंदडानगर येथील संत गजानन महाराजांची महिला वारी आज सकाळी शेगावकडे निघाली.
अमळनेर ते शेगाव महिला पायी वारी आज दिनांक 13-12-2019 ते 21-12-2019 पर्यंत पायी प्रवास करून ठिकठिकाणी विश्रांती घेणार आहेत.
सकाळी अमळनेर येथील गजानन महाराज मंदिरात आरती करण्यात आली.नंतर वारीत चालतांना एका बाजूस चालावे व शिस्तीचे पालन करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले मुंदडा नगर संत गजानन मराठी मंदिरापासून महिलांची वारी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वाजत-गाजत शेगांवला रवाना झाली . महिला वारीची सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे शिस्तबद्धता, हे आहे यावेळी अनेकांनी पालखीचे दर्शन घेतले.
वारीप्रमुख सौ ज्योती पवार व गजानन भक्त उर्मिला जगताप तेजस्विनी बोरसे सरला चव्हाण हिना पाटील पूजा पाटील
प्रियंका पाटील अंकीता पाटील बबित पाटील शोभा कोळी वंदना भारती छाया शिंगाने संगीत पाटील शीतल पाटील
सेवाधारी खंदु पाटील परेश पाटील अनिल पाटील मोहित पवार जगदीश साठे सुनील पाटील व संत गजानन महाराज सेवा संस्थाचे अध्यक्ष प्रा.आर.बी.पवार व विश्वस्त व भाविक उपस्थित होते.
यावेळी मुंदडा नगर, सुरभी कॉलनी, गुरुकृपा कॉलनी ,पाटील कॉलनी ,मारवड अमळगाव ,पिंगळवाडे,सडावन, येथील भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.






