Erandol

राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान अंतर्गत मोफत कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप

राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान अंतर्गत मोफत कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप

विक्की खोकरे
एरंडोल – शहरात सुरू असलेल्या जय श्री दादाजी फाऊंडेशन संचलित पूजा ब्युटी हब अँड गव्हर्मेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये (DAY-NULM) च्या अंतर्गत मोफत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले..
या कार्यक्रमात एरंडोल नगर परिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, कार्यालय अधीक्षक संजय ढमाळ, सहाय्यक प्रकल्प अधिकारी महेंद्र पाटील ,सौ.आरती ठाकूर, स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रिन्सिपल,वंदना पवार आदी मान्यवर उपस्थित होते सुनिता बोरसे मॅडम यांचे कार्य महीला सक्षमीकरणासाठी व स्वयंरोजगार उपलब्ध करून एक आत्मविश्वासाने प्रगतीकडे जाईल असे मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी प्रतिपादन केले आणी उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या
पूजा ब्युटी हबच्या संचालिका व अरोमा थेरेपिस्ट सौ सुनिता बोरसे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व अशाच प्रकारे विविध मोफत मार्गदर्शन प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा मानस असल्याचे सुनीति बोरसे मॅडम यांनी आश्वासन दिले आभार प्रदर्शन दीपका चौधरी यांनी मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button