चांपा/नागपूर

विजय महाविद्यालयमध्ये तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन

विजय महाविद्यालयमध्ये तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन

अनिल पवार

चांपा -संशोधनातून देश प्रगतीच्या वाटेवर चालणे अधिक सोपे होणार आहे. जगाच्या पाठीवर आपले दैनंदिन जीवन अधिकाधिक सुकर करण्यासाठी निरनिराळे शोध संशोधकांकडून लावले जातात. विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करुन जनतेला, शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतील अशा उपकरणांची निर्मिती करावी, असे आवाहन उमरेडचे गटशिक्षणाधिकारी सहायक गटविकास अधिकारी जयसिंग जाधव यांनी केले.

उमरेड पंचायत समिती शिक्षण विभाग व विजय विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विजय विद्यालयमध्ये गटविकास अधिकारी , गटशिक्षणाधिकारी जयसिंग जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे विजय विद्यालय संस्थेचे अध्यक्ष विजय भोयर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ‘शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम’ या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन असून, विविध प्रकल्पांचे सादरीकरण यात करण्यात आले आहे. न्यूटनच्या तिन्ही नियमांचा वापर करून तयार केलेल्या प्रकल्पाद्वारे अनोख्या पद्धतीने प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विज्ञानाची कासधरा कुटुंबाचा विकास करा असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी जयसिंग जाधव यांनी केले . विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांचे कौतुक करत त्यांनी संशोधन करण्याविषयी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. विजय विद्यालय संस्थेचे सचिव दामोदर गोरले यांनी प्रत्येक मुलात संशोधक लपला असून, त्याला जागे करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मनोज पाटील यांनी विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश सांगून त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यापक वैज्ञानिक दृष्टीकोनाचे कौतुक केले.

या वर्षी आरोग्य आणि सुदृढ आरोग्य, संसाधन व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षा, कचरा व्यवस्थापन आणि जलाशयाचे संरक्षण, वाहतूक आणि दळणवळण, डिजिटल व तांत्रिक समाधान, गणितीय प्रतिकृती हे विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. या विषयांवर प्रकल्पांचे सादरीकरण प्रदर्शनात करण्यात आले आहे. तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी यामध्ये प्रकल्प सादर करुन विज्ञानाविषयी गोडी दाखवून दिली आहे. प्रदर्शनाचे प्रास्ताविक विजय विद्यालयचे मुख्यध्यापक विजय नागदेवे यांनी केले. विद्यार्थीदशेत संशोधनाचे बीज त्यांच्यात रोवावे, या उद्देशाने हे प्रदर्शन दरवर्षी आयोजित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन चंदन तागडे यांनी केले. तर आभार अशोक राठोड यांनी मानले. यावेळी तालुक्यातील शिक्षक व विद्यार्थांनी सहभाग घेतला यावेळी प्रयोगाचे परिक्षकांनी यशस्वी ठरलेल्या प्रयोगांना मान्यवरांनी बक्षिसे वितरण केले .या कार्यक्रमाला सर्व संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी शिक्षक पालकवर्ग उपस्थीत होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button