आमदार डाॅ.विनय कोरेंनी टपरीवर चहाचा घेतला आस्वाद….
सुभाष भोसले-कोल्हापूर
शाहूवाडी आभार दौऱ्यासाठी जात असताना जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शाहूवाडी-पन्हाळयाचे आमदार डाॅ.विनय कोरे यांनी टपरीवर चहाचा आस्वाद घेत आपली माणूसकी दाखवली त्यांनी ड्रायव्हरला एका टपरीवर गाडी थांबवायला सांगितली आमदार डाॅ.विनय कोरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच आभार दौऱ्यात माणूसकीची एक झलक दाखवली .आमदार विनय कोरे यांची गाडी थांबली म्हणल्यावर सर्व ताफ्यातल्या गाड्या थांबल्या यांच्यासह सगळे टपरीवर चहा पित असताना राजकारणाच्या धामधूमीचे विषय निघाले.आपले लाडके आमदार चहा पिताना दिसल्यावर कार्यकर्त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये पटकन क्षण टिपले….जनसामान्याची कदर करणारे आमदार अशी भावना यावेळी उपस्थित जनसमुदायांनी व्यक्त केली यावेळी
करणसिंह गायकवाड,जनसुराज्यपक्षाचे शाहूवाडी संपर्कप्रमुख,सर्जेराव पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.






