प्रा.एस.पी.पाटील यांची कोजीमाशी च्या मुरगुड शाखा सदस्यपदी निवड
सुभाष भोसले-कोल्हापूर
मुरगुड विद्यालय ज्युनिअर काँलेजचे उपप्राचार्य प्रा.एस.पी.पाटील यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पत संस्थेच्या मुरगुड शाखा सदस्य पदी निवड झाली आहे.या निवडीचे पत्र शिक्षकनेते दादासाहेब लाड,चेअरमन राजेंद्र रानमाळे, व्हाईस चेअरमन सुभाष पाटील, माजी चेअरमन विद्यमान जेष्ठ संचालक बाळ डेळेकर यांनी त्यांना दिले आहे.या निवडीकामी शिक्षण प्रसारक कोल्हापूर चे सचिव प्रा.जयकुमार देसाई, अध्यक्षा शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत,पेट्रन सदस्य युवानेते दौलत देसाई, प्रशासनाधिकारी मंजिरीताई देसाई, प्राचार्य एस.आर.पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.
प्रा. एस.पी.पाटील यांचे सर्व आजी -माजी विदयार्थी ,पालक ,शिक्षक बंधूभगिनी,मित्रपरिवार ,नातेवाईक यांचेकडून अभिनंदन होत आहे.






