आखिल भारतीय ग्राहक पंचायत
कोल्हापूरच्या जिल्हासचिवपदी
सर्जेराव खाडे
कोल्हापूर-सुुभाष भोसले
तिसंगी(ता.गगनबावडा) येथील सर्जेराव विष्णू खाडे यांची आखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूरच्या जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली.
सर्जेराव खाडे यांनी गेल्या वर्षभरात आखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून ग्राहक चळवळ व संघटन वाढीसाठी केलेले प्रयत्न व ग्राहक संरक्षण कायद्याच्या जागृतीसाठी केलेल्या विशेष सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांना जिल्हा सहसचिव पदावरुन पदोन्नती देत जिल्हा सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली.
नेवासा,जिल्हा अहमदनगर येथे ९ व १० नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या आखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या प्रांतिक अधिवेशन प्रसंगी ही निवड जाहीर करण्यात आली.
आखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्य महाराष्ट्र प्रांताचे प्रांताध्यक्ष धनंजय गायकवाड यांच्या हस्ते जिल्हा अध्यक्ष अरुण यादव यांच्या उपस्थितीत निवडीबाबतचे नियूक्तीपत्र देण्यात आले.
त्यांना जिल्हा अध्यक्ष अरुण यादव,प्रसाद बुरांडे,जिल्हा महिला अध्यक्षा अॅड.सुप्रिया दळवी,जिल्हा संघटक जगन्नाथ जोशी,शिवनाथ बियानी,प्रशांत पुजारी,रमेश बंडगर,तालुका अध्यक्ष विश्वनाथ पोतदार,सुहास गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.






