Kolhapur

करवीर जुनी पेन्शन ह्क्क संघटन कार्यकारिणी मीटिंग संपन्न

करवीर जुनी पेन्शन ह्क्क संघटन कार्यकारिणी मीटिंग संपन्न

सुभाष भोसले-कोल्हापूर
करवीर जुनी पेन्शन हक्क संघटन कार्यकारिणी ची मीटिंग टाऊन हॉल बागेत संपन्न झाली. मीटिंगमध्ये अनेक विषयावर चर्चा करणेत आली. करवीर तालुक्यातील 36 अध्यापक व विषयशिक्षक यांचे चटोपाध्याय प्रस्ताव पूर्ण कार्यवाही झाली असून 60 निवडश्रेणी(24 वर्ष पूर्ण)प्रस्ताव काम अंतिम टप्यात असून येत्या 4 दिवसांत प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पोहचतील यासाठी प्रयत्न करणेचे ठरविले. येत्या शिक्षक बँक निवडणुकीत संघटन महत्वाची भूमिका बजावणार आहे म्हणूनच जिल्हा कार्यकारिणी च्या भूमिकेस करवीर मार्फत पाठिंबा देणेचा निर्णय घेणेत आला.

करवीर तालुक्यात चांगल्या संख्येने पदवीधर नोंदणी केली आहे त्याबद्दल सर्वाचे आभार मानण्यात आले अजून जे शिक्षक किंवा संबंधित नातेवाईक बाकी असतील जानेवारी 2020 मध्ये त्यांच्या नोंदीसाठी संघटन प्रयत्न शील राहणार असण्याचे सांगणेत आले.
करवीर मध्ये सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने 2016/17 शेड्युल्ड कामकाज पूर्ण झाले असून उर्वरित 17/18 व 18/19 या 2 वर्षाचे अपूर्ण काम आपल्यातील 5 technosevi शिक्षक लॅपटॉप सह व मदतीसाठी 5 बांधव उपस्थित राहून 2 दिवसांत काम पूर्ण करण्याचे ठरविणेत आले.

वरील विषयावर महिला आघाडी तालुकाध्यक्ष सादिया मुजावर व सरचिटणीस माधुरी माने यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून महिला आघाडी वतीने ही पाठींबा देणेत आला.
या मिटिंग साठी राज्यकार्याध्यक्ष सर्जेराव सुतार,जिल्हा सरचिटणीस तुषार पाटील,अध्यक्ष संतोष गायकवाड, करवीर सरचिटणीस शिवतेज बाजारी, करवीर उपाध्यक्ष नितीन कांबळे,कार्याध्यक्ष अमर पाटील, तंत्रस्नेही व प्रवक्ते चेतन शिंदे व संदिप बाटे व इतर शिलेदार उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button