स्वामी समर्थ केंद्राच्या भक्त महिला मंडळातर्फेवर्णेश्वर महादेव मंदिराच्या महादेव पिंडावर अर्धकिलो चांदीचे छत्र अर्पण
अमळनेर येथिल वर्णेश्वर महादेव मंदिराच्या महादेव पिंडावर अर्धकिलो चांदीचे छत्र चातुर्मास समाप्ती निमित्त स्वामी समर्थ केंद्राच्या महिलांनी अर्पण केले आहे.
अमळनेर येथिल स्वामी समर्थ केंद्राच्या भक्त महिला मंडळातर्फे रोज पहाटे ५ वाजता वर्णेश्वर महादेव मंदिराच्या महादेव पिंडावर जलाभिषेक नियमितपणे करीत होत्या. महिलांतर्फे चातुर्मास निमित्त उपवास करण्यात आलेले होते. चातुर्मास समाप्ती च्या दिवशी कार्तिकी एकादशी निमित्ताने या सर्व भक्त सेवेकरी महिलांनी एकत्रितपणे स्वखर्चाने वर्णेश्वर महादेव मंदिराच्या महादेव पिंडावर धरण्यासाठी अर्धा किलो चांदीचे छत्र वर्णेश्वर महादेव मंदिराला अर्पण केले .याप्रसंगी ट्रस्ट चे अध्यक्ष सुभाष चौधरी,संजय शुक्ल,एस.यु.पाटील यांच्या सह सर्व सेवेकरी भक्त महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.






