विजयकुमार कांबळे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
सुभाष भोसले-कोल्हापूर
शैक्षणिक ,सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेबद्दल बळवंतराव मराठे विद्यालयचे शिक्षक व पुणे विभाग बहुजन अधिकारी महासंघचे कार्याध्यक्ष विजयकुमार कांबळे यांना इन्होव्हेटिव्ह टिचर्स ऑफ इंडिया चा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करणेत आले हा पुरस्कार त्यांना आतंरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ डॉ रामचंद्र साबळे,आमदार संग्राम जगताप ,शिवाजीराव घाटगे यांच्या हस्ते बालगंधर्व रंग मंदिर पुणे येथे दिमाखदार सोहळ्यात प्रदान करणेत आला.
विजयकुमार कांबळे यांचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात आहे , त्यांचे शिक्षण एम एस सी बीएड आहे. ते सध्या श्री बळवंतराव मराठे विद्यालय, मिरज ,जि सांगली येथे गेली पंधरा वर्षे कार्यरत आहेत .ते अनेक सामाजिक व शैक्षणीक कार्यात कार्यरत आहेत , थोर महापुरुष यांच्या जीवनावर व्याख्यान आयोजीत करणे, स्वतः व्याख्यान देणे, व्यसनमुक्ती व अंधश्रध्दा निर्मूलन प्रयत्न, स्पर्धा परीक्षा यांचे विदयार्थ्यांना मोफत मार्गदर्शन, अनेक गरीब व होतकरू मुलांना शैक्षणिक मदत व शैक्षणिक पुनर्वसन यासाठी ते नेहमी क्रियाशील आहेत.
विदयार्थ्यांच्या मदतीने त्यांनी अनेक ठिकाणी वृक्षारोपण व पर्यावरण जागृती केली आहे तसेच अनेक महापालिका, जिल्हापरीषद शाळेतील विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे. गुणवत्तापूर्ण वाढीसाठी ते विदयार्थ्यांना नेहमी करिअर मार्गदर्शन करतात ते संघटनात्मक कार्यात नेहमी अग्रेसर असतात. बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ या संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून ते कार्य करत आहेत त्यांनी या कालावधीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व इतर कर्मचारी यांचे अनेक समस्या निराकरण व शासन दरबारी, पाठपुरावा करणेसाठी प्रयत्न केले आहेत.सध्या याच संघटनेत पुणे विभाग कार्याध्यक्ष पदी त्यांची निवड झाली आहे. यापूर्वी त्यांना अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करणेत आले आहे.त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






