सर्वांनी शिक्षक व पदवीधर मतदान नोंदणी करावी-दादासाहेब लाड
सुभाष भोसले-कोल्हापूर
सर्व शिक्षक बंधू -भगिनीनी पदवीधर व शिक्षक मतदार नोंदणी करावी असे आवाहन शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी विदयाभवन कोल्हापूर येथे केले कलेक्टर ऑफिस कडून आलेल्या सूचनांनुसार…..
फॉर्म सोबत जोडावयाची कागदपत्रे….
1) आधार कार्ड
2) मतदान ओळखपत्र
3) पदवी प्रमाणपत्र
4) लग्नानंतर नाव बदल्याचे विवाह नोंदणी दाखला तसेच शिक्षक नोंदणीसाठी वरील कागदपत्रे व सेवेत असलेला दाखला आवश्यक आहे ही सर्व कागदपत्रे ट्रू कॉपी करावीत. यासाठी तहसील ऑफिस मध्ये नायब तहसीलदार यांचे दोन टेबल फक्त ट्रू कॉपी करण्यासाठी आहेत. तसेच गट विकास अधिकारी कॉलेजचे प्राचार्य तसेच अन्य राजपत्रित अधिकारी यांनाही अधिकार देण्यात आला आहे. तिथूनच करून घ्यावी. पण सोबत जाताना ओरिजनल कागदपत्रे घेऊनच जावीत.ट्रू कॉपी ही माध्यमिक मुख्याध्यापक किंवा विशेष कार्यकारी अधिकारी यांच्याकडून करून घेऊ नये.
6 नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. कोणतीही अडचण आल्यास कधीही संपर्क करा असे ते म्हणाले.या कार्यक्रमास बाबासाहेब पाटील,जीवन साळुंखे ,राजेंद्र रानमाळे,दत्तात्रय पाटील,बाळ डेळेकर,हिंदूराव पाटील,काकासो भोकरे,अनिल चव्हाण,कैलास सुतार,प्रल्हाद पताडे,शांताराम तौंदकर,अरविंद किल्लेदार,शाम पाटील,आर आर पाटील,एस आर पाटील ,प्रा तुकाराम पाटील यांचेसह विविध संघटनेचे पदाधिकारी ,मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.






