Kolhapur

शिवसेनेचे प्रकाश आबिटकर सलग दुसऱ्यांदा आमदार.

शिवसेनेचे प्रकाश आबिटकर सलग दुसऱ्यांदा आमदार.

सुभाष भोसले-कोल्हापूर
राधानगरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार आबिटकर यांनी राष्ट्रवादी च्या माजी आमदार केपी पाटील यांचा अठरा हजार चारशे तीस इतक्या मताधिक्याने पराभव केला.सलग दोनवेळा आमदार आबिटकर यांच्या कडून केपी पाटील यांचा पराभव झाला आहे. उमेदवारांची संख्या वाढल्याने अतिशय अटीतटीच्या आणि चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत माजी आमदार केपी पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे.नेते विरुद्ध जनता अशीच ही लढत झाल्याने या निकालाने जनतेने निवडणूक हातात घेतल्याचे निकालावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. तर नेत्यांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ मतदारांनी आणून ठेवली आहे.
सकाळी आठ वाजता श्री.मौनी विद्यापीठातील क्रीडा संकुलात मतमोजणीस प्रारंभ झाला. पहिल्या फेरीपासूनच आमदार आमदार प्रकाश आबिटकर यांचे मताधिक्य वाढत होते.
निकाल लागताच आमदार आबिटकर यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करीत मिरवणूक काढली.डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिरकत होती.

आम बंटी पाटील ,आम पी एन पाटील ,विजयसिंह मोरे यांच्यासह कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.लहानमोठ्या सर्व नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत केपी पाटील यांच्या विजयासाठी कंबर कसली होती.परंतु इथला मतदार कोणाचा बांधील नसून तो स्वतःच्या विचाराने मतदान करतो .हे या निकालावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.१६४४मतदारांनी नोटा ला मतदान केले आहे.
माजी आमदार केपी पाटील यांच्या सोबत गोकूळ चे संचालक अरुण डोंगळे,वंचितचे जीवन पाटील यांनी घेतलेल्या मतांचा फटका माजी आम केपी पाटील यांना बसला आहे.काँग्रेस , राष्ट्रवादी चे सर्व नेते एकत्र येऊनही केपी पाटील यांचा पराभव रोखू शकले नाहीत.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आमदार आबिटकर हे आघाडीवर राहिले होते. आघाडी कमी मतांनी होती पण विजयी घौडदौड सुरू राहिली.सातव्या फेरीत आबिटकर यांना ४६५८ तर पाटील यांना ५१५७ मते मिळाली. या फेरीत ४९९ मतांनी आबिटकर पिछाडीवर राहिले. दहाव्या फेरीत आबिटकर यांना ६३१८ तर पाटील यांना ६९४७ मते मिळाली. या फेरीत ६२९ मतांनी आबिटकर पिछाडीवर राहिले. अकराव्या फेरीत आबिटकर यांना ४३७४ तर पाटील यांना ४४७२ मते मिळाली. या फेरीत ९८ मतांनी आबिटकर पिछाडीवर राहिले.या तीन फेऱ्या वगळता माजी आमदार केपी पाटील यांना ही घौडदौड रोखता आली नाही. राधानगरी तालुक्यातील मते मोजून होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अपयशाची चाहूल लागली. तर आमदार आबिटकर गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यास सुरवात केली होती.मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात आमदार आबिटकर हे मतमोजणीच्या ठिकाणी आले होते.

२४४७०२ मतदारांनी मतदान केले होते.७५.१४% इतके मतदान झाले होते पोस्टल मतदान २५१२ आहे.यामध्ये आमदार आबिटकर हे १५१ मतांनी आघाडीवर राहिले आहेत.उमेदवारांना पडलेली एकूण मते कंसात आकडे….
आमदार प्रकाश आबिटकर (१०५८८१ )
माजी आमदार केपी पाटील(८७४५१)
वंचित बहुजन आघाडी जीवन पाटील(७८३२)
अपक्ष राहुल देसाई(१२८९५ ),
सत्यजित जाधव(५९५२ )
अरुण डोंगळे(१५४१४ )
चंद्रकांत पाटील(८०९३)
मनसे युवराज यडुरे(९६०)
दिनकर चांदम(२१९)
कृष्णा देसाई(२३३)
विजय शिंदे (२७७),प्रवीण कोरगावकर(१६५),नोटा (१६४४)
वंचितचे जीवन पाटील,अरुण डोंगळे ,राहुल देसाई यांनी घेतलेल्या मतांचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार केपी पाटील यांना बसला आहे.गत निवडणुकीत हे तिन्ही नेते केपी पाटील यांच्या सोबत होते.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ संपत खिलारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम,मीना निंबाळकर पोलीस निरीक्षक संजय पतंगे,उदय डुबल यांच्या सह सर्व निवडणूक अधिकारी, कर्मचारी,कोतवाल ,पोलीस यांनी विशेष काळजी घेतली .

प्रतिक्रिया
आम आबिटकर
शिवसेना,भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेले कष्ट आणि कोणत्याही दिगग्ज नेत्यांच्या ओझ्याखाली न दबता स्वाभिमानी मतदारांनी विकासाला दिलेलं मत हे लोकशाही जिवंत असल्याचे द्योतक आहे.हा विजय सर्वसामान्य जनतेचा आहे.यापुढेही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र कष्ट घेणार.

माजी आमदार केपी पाटील
निवडणूक म्हटलं की जय पराजय आलाच. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे.यापुढेही आम्ही जनतेच्या सेवेत सक्रिय राहणार आहे.

१) पराभव राष्ट्रवादी च्या जिव्हारी लागणारा
गत विधानसभा निवडणुकीत माजी आमदार केपी पाटील यांचा आमदार आबिटकर यांनी ३९०००हजार मताधिक्याने पराभव केला होता.हा पराभव जिव्हारी लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेस च्या नेत्यांनी विजयासाठी जीवाचे रान केले होते परंतु याही वेळी त्यांना पराभव रोखता आला नाही.
२)घोडा आणला
प्रचारा दरम्यान आमदार आबिटकर यांच्या घोड्यावरील वक्तव्यावर विरोधकांनी रान उठवले होते.आज मिरवणूक काढताना आमदार आबिटकर यांच्या कार्यकर्त्यांनी दोन घोडी मिरवणुकीत आणली होती.

३)अपक्षांचा अपेक्षभंग
अपक्ष उमेदवारांनी विजयी होणारच या अविर्भावात प्रचारात आघाडी घेतली होती. पण त्यांचा अपेक्षभंग झाला.

४) गठ्ठा मतदान देण्याच्या वल्गना करणारे नेते कट्ट्यावर
या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व्यासपीठावरून गठ्ठ्याने मतदान देतो अशी वल्गना करणाऱ्या नेत्यांना मतदारांनी कट्ट्यावर बसवले.
५) बिद्रीचा करिष्मा चालला नाही
माजी आमदार केपी पाटील यांनी बिद्री कारखान्यात उच्च्यांकी ऊस दर दिला आहे.त्याचबरोबर नोकर भरती करणार असल्याचे सांगितले होते.पण या निवडणुकीत त्याचा काहीही परिणाम जाणवला नाही.

६) मनसे ची नामुष्की
या निवडणुकीत मनसेने युवराज यडुरे यांना उमेदवारी दिली होती. त्यांना अवघे मते पडलीत. विजयाची हमी देणाऱ्या मनसेला नामुष्की पदरी पडली आहे.
७)मतदारसंघात खरी लोकशाही
राधानगरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविताना पक्षा पेक्षा व्यक्तीला महत्व दिले जाते.गेल्या निवडणुकीत आमदार आबिटकर यांना एकोणचाळीस हजारांचे मताधिक्याने विजयी केले होते.या वेळी सर्व नेते एका बाजूला असतांना देखील अठरा हाजारांचे मताधिक्य दिले.त्यामुळे येथे खऱ्या अर्थाने लोकशाही मार्गाने निवड होत असते.हे मतदारांनी मतदानातून सिद्ध केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button