आखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूर यांची आढावा बैठक संपन्न
सुभाष भोसले,कोल्हापूर
आखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी व तालुका अध्यक्ष यांची मेंढा (अहमदनगर) प्रांतीय अधिवेशन पूर्व तयारी आढावा बैठक आज मंगळवार दिनांक २२ ऑकटों रोजी जिल्हा कार्यालय कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अरुणजी यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.या मिटींग संपन्नमध्ये खालील विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
९ व १० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या प्रांतीय अधिवेशात कोल्हापूर जिल्ह्यातून सदर अधिवेशनास प्रत्येक तालुक्यातून किती कार्यकर्ते उपस्थित राहणार याची निश्चीत आकडेवारी देण्याचे ठरविण्यात आले,प्रांतीय अविवेशनास उपस्थित राहण्यास येणारा प्रवास खर्च याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली, मेंढा प्रांतीय अधिवेशनास दि ८नोव्हें रोजी सकाळी ९:००वाजता सर्वांनी एकत्र निघण्याचे ठरले,कोल्हापूरातुन सर्वच तालुक्याचे मिळून १०० कार्यकर्ते मेंढा अधिवेशनास जाण्याचे ठरले.
आखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या या जिल्हा बैठकीस जिल्हाअध्यक्ष अरुणजी यादव,महिला जिल्हाअध्यक्षा अॅड.सुप्रिया दळवी, शिवनाथ बियाणी,सुहास गुरव,सचिव अनिल जाधव,सर्जेराव खाडे,पूष्पा पाटील,विश्वनाथ पोतदार, वैदेही पाध्ये,निशा बडवे,सागर पोवार,रमेश पाटील,तानाजी पाटील,मनाली स्मार्त विद्या गोसावी,शशिकांत काळे, विठठल चव्हाण ,दयानंद सुतार ,आर पी पाटील आदीसह सर्व तालुक्याचे तालुका अध्यक्ष उपस्थित होते.






