Amalner

मतदाना दरम्यान अनेक बुथवर अनुचित प्रकार प्रशासनाचे दुर्लक्ष…

मतदाना दरम्यान अनेक बुथवर अनुचित प्रकार प्रशासनाचे दुर्लक्ष…

अमळनेर
आज सकाळ पासून अमळनेर तालुक्यात विधानसभा निवडुणुकीच्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. जळगांव जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे पाच वाजे पर्यंत 60% मतदान झाले होते. त्यानंतरही मतदान प्रक्रिया सुरू होती त्यामुळे अमळनेर येथे मतदान केंद्रावर चांगलीच गर्दी होती परंतु याच बरोबर काही अनुचित कायद्याचे उल्लंघन करणारे प्रकार ही अनेक ठिकाणी घडले.त्यात मतदान करताना व्हिडीओ आणि फोटो देखील काढले गेले आणि सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत.

तसेच अनेक मतदान केंद्रावर भेट दिली असता सुविधांचा अभाव आढळून आला त्यात मुख्यत्वे रुग्ण वाहिका ,प्राथमिक उपचार सुविधा ,अपंग साठी रॅम्प उपलबध नव्हते तसेच काही केंद्रांवर खूप सजावट करण्यात आली होती तर काही केंद्रे ही अत्यन्त वाईट अवस्थेत असलेली आढळून आली.

मत देताना व्हिडीओ किंवा फोटो काढणे याची परवानगी नसताना देखील अनेक जणांकडे मोबाईल असल्याचे निदर्शनास आले. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून स्वतःच कायदा मोडला आहे असे म्हणावे लागेल.
पोलीस प्रशासनाने आपला बंदोबस्त व्यवस्थित ठेवण्यात यश मिळवत कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button