अमळनेर तालुक्यात विधानसभा निवडणुकी साठी प्रशासन सज्ज
अमळनेर विधानसभा क्षेत्रात सोमवारी होत असलेली निवडणूक व्यवस्थित पार पडण्याकामी एकूण 320 मतदान केंद्रावर 2357 कर्मचारी सुसज्ज करण्यात आले. रविवारी च कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशिन सह इतर साहित्य वाटप करून नियुक्ती केलेल्या बुथ वर वाहनांनी रवाना करण्यात आले, या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अमळनेर प्रांत अधिकारी सीमा अहिरे यांनी सूचना सह मार्गदर्शन केले.
यावेळी मतदान संघात एकूण 32 केंद्रावर वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच प्रत्येक केंद्रावर पाळणाघर व अपंगव्यक्तीनां मतदान करता यावे यासाठी योग्य काळजी घेतली गेली आहे. ७केंद्रावर व्हिडीओ ग्राफर व 13 सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात आले आहे, १३४ क्रमांकाचे बुथ हे सखी केंद्र म्हणून ठेवण्यात आले आहे, या केंद्रावर मतदान कर्मचारी सह पोलिस कर्मचारी हे सर्व महिला नियुक्ती करण्यात आले आहे.
कायदा सुव्यवस्था राखण्याकामी १५ अधिकारी सह राखीव पोलिस दला, बॉर्डर विंग(गुजरात), पोलीस दल , होमगार्ड आदी सह ५५० सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहे.
मतदारांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता निःसंकोचपणे मतदानाचा अधिकार बजवावा व लोकशाहीच्या या महोत्सवात सहभागी व्हावे, असे निवडणूक निर्णय अधिकारी सीमा अहिरे यांनी आव्हान केले.






