देवगाव देवळी येथे मतदार जनजागृती निमित्ताने प्रभातफेरी
अमळनेर प्रतिनिधी- देवगांव देवळी ता.अमळनेर येथे महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
जळगाव जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे,व अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन यांच्या आदेशानुसार सकाळी सात वाजता देवगाव देवळी येथे मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी स्लोगन घोषणा दिल्या.
देवगाव देवळी येथे मतदार राजा जागा हो या घोषणा ने संपूर्ण परिसर दणाणून गेला
यावेळी देवगाव देवळी हायस्कुलचे मुख्याध्यापक अनिल महाजन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक खेमराज बोरसे, शिक्षक आय आर महाजन ,एच.ओ. माळी,अरविंद सोनटक्के, एस.के.महाजन, शिक्षकेत्तर कर्मचारी व आरोग्य सेवक राकेश शिंपी,जिल्हा परीषदेचे कर्मचारी त्र्यंबक रणदिवे ,अरविंद सोनवणे ,रेखा सोनवणे, सरिता जाधव ,राजेंद्र पाटील, अंगण देवगाव देवळी येथील अंगणवाडी कर्मचारी विमलबाई निकुंभ, सरला महाजन ,सविता माळी, गायत्री पाटील, उज्वला पाटील उपस्थित होते.






