चांपा येथे बिएलओ कडुन मतदार स्लिपचे घरपोच वाटप
मतदानाचा हक्क बजावण्याचे केले आवाहन
अनिल पवार
चांपा ता , १७:-लोकसभा निवडणुकीत व्होटर स्लिपचा चांगलाच घोळ झाल्याने यंदा विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या पाच दिवसाआधीच चांपा गावात बिएलओ कडुन मतदार स्लिपचे घरपोच वाटप करण्यात आले .
५१उमरेड विधानसभा निवडणुक२०१९ साठी सोमवारी २१ऑक्टोंबरला मतदान होत असून चांपा बूथ क्र ६७चे बिएलओ पी.बि .चौधरी हे मतदारांना घरपोच स्लिप पोहचवण्याचे काम करीत आहे .यावेळी त्यांनी मतदारांना मतदानाचा हक्क आवर्जून बजविण्याचा संदेश दिला .उमरेड तालुक्यातील लोकसंख्येच्या द्रुष्टीने मोठया असलेल्या चांपा गावात सुमारे ८७९मतदार आहेत .या सर्वांना मतदान स्लिप आज घरपोच देण्यात आल्या .आता सोमवारी ता .२१ला कीती मतदान होणार याची उत्सूकता सर्वांनाच लागली आहे .






