Amalner

शिरिषदादांचे राजकारण जाती पातीचे नाही तर विकासाचे — खासदार उन्मेश दादा पाटील

शिरिषदादांचे राजकारण जाती पातीचे नाही तर विकासाचे — खासदार उन्मेश दादा पाटील

मनोज भोसले
अमळनेर — गेल्या पन्नास वर्षांत अमळनेर मतदारसंघाचा विकासाचा अनुशेष शिरीष दादा चौधरी यांनी भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. राज्यात आणि केंद्रात एकाच विचाराने सरकार सतारुढ होणार असून यापुढे ही अमळनेर तालुक्यात विकासाची गंगा सुरू राहावी यासाठी शिरीष दादा यांना पुन्हा निवडून आणा. जाती पातीचे नाही तर विकासाचे राजकारण करणारा आमदार निवडून द्या असे आवाहन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केले. भाजप शिवसेना आर पी आय मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार शिरिष दादा चौधरी यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी सात वाजता भगवा चौक येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नेत्या एड. ललिता ताई पाटील, डॉ. रविबापू चौधरी, उपनगराध्यक्ष लालचंद सेनानी, भाजप शहराध्यक्ष हरचद लांडगे, शाम पाटील, नगरसेवक सलीम भाई , चाळीसगाव भाजप तालुकाध्यक्ष के बी दादा साळुंखे, सुनील भामरे, संजय पाटील, मनोज पाटील गटनेते प्रवीण पाठक, नगरसेवक विनोद पाटील, आर पी आय चे शाम सदांशिव यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी आमदार शिरिष दादा चौधरी आणि जेष्ठ नेत्या ललिता ताई पाटील यांची भाषणे झाली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button