Kolhapur

सर्वांनी शिक्षक व पदवी मतदार संघातील नोदंणी करा-मंगेश धनवडे

सर्वांनी शिक्षक व पदवी मतदार
संघातील नोदंणी करा-मंगेश धनवडे

सुभाष भोसले-

कोल्हापूर 1आक्टोंबर ते 31 ऑक्टोंबर सगळीकडे शिक्षक व पदवीधर मतदार संघातील मतदार नोंदणी* सुरू आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य जुनी हक्क पेन्शन संघटना कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे म्हणाले की, सद्यस्थितीत सगळीकडे निवडणुकीचे वातावरण आहे. पण आपण कधी विचार केला आहे का? प्रत्येक राजकीय पक्ष समाजातील प्रत्येक वर्गावर कार्य करत असतो. संख्यात्मक बेरजेचे राजकारण करत असतो. त्यांच्यासाठी शेतकरी, कामगार, तरुण, महिला, जात, धर्म, भाषा, प्रांत असे खूप वर्ग असतात. पण सध्याच्या बदलत्या राजकारणात शासकीय कर्मचारी हा वर्ग गृहित धरलाच जात नाही किंवा गृहीत धरूनच प्रत्येक राजकीय पक्षाचे काम चालू आहे. शासकीय कर्मचारी आणि त्यामध्ये खास करून सर्व शिक्षक बांधवांनी या सगळ्याचा अंतर्मुख होऊन अभ्यास करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात सहा शिक्षक आमदार असतात. पण पण यांची निवड प्रक्रियेमध्ये किती शिक्षक सहभागी आहेत? मोजक्या शिक्षक वर्गावर ही निवड प्रक्रिया अवलंबून तर नाही ना ? महाराष्ट्रात 70 टक्के शिक्षक असून देखील ते या निवड प्रक्रियेत का नाहीत? ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. आपणच आपल्यासाठी तयार केलेले नियम दाखवून सर्व शिक्षकांना यापासून वंचित ठेवलं आहे. पण नियम, कायदा, कानून या गोष्टी अधिकार मिळवून देण्यासाठी असतात, अधिकारापासून वंचित ठेवण्यासाठी नाही. प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा अधिकार मिळत नाही, याबद्दल आपल्याला काहीच वाटेनासे झाले आहे. कदाचित आपण हे मान्य करूनच चाललोय की, या मतदान प्रक्रियेत आपण कधीच समाविष्ट होणार नाही. मला राहून राहून प्रश्न पडतो की आपल्यावर अन्याय होतोय याची जाणीव जर आपल्याला नसेल तर याला जिवंत मन कशी म्हणावीत…. हे चिंतनीय आहे. भविष्यात यावर प्रचंड मोठा आक्रोश निर्माण करावा लागणार आहे.

राहता राहिला प्रश्न पदवीधर निवडणुकी बाबत….. सद्यस्थितीत पदवीधर मतदारसंघात शासकीय कर्मचाऱ्यांनी आणि खास करून प्राथमिक शिक्षकांनी आपली व आपल्या संबंधित सर्वांची मतदार नोंदणी करणे, ही काळाची गरज आहे. आज पुणे मतदारसंघाचा विचार करताना शासकीय कर्मचाऱ्यांची मते ही निकालाचा रोख ठरवू शकतात आणि किंगमेकर म्हणून भूमिकाही बजावू शकतात. जर आपल्या प्रश्नांसाठी या प्रतिनिधींवर वचक ठेवायचा असेल तर प्राथमिक शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नाव नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये नाव नोंदणी सुरु आहे. आज याबाबत थोडी प्रत्यक्ष माहिती घेतली असता प्रत्यक्ष तहसीलमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. संघटनेच्या माध्यमातून एकत्रित येऊन 18 नंबर चा फॉर्म व त्यासोबत फोटो, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र आणि पदवीधर प्रमाणपत्र (कोणत्याही विषयातील) ही कागदपत्रे साक्षांकीत प्रतीसह जोडणे आवश्यक आहे. प्रत्येक तालुक्याच्या स्थानिक परिस्थितीनुसार आपले संघटन नियोजन करत आहे. अधिक माहितीसाठी संघटनेच्या तालुका प्रतिनिधींशी संपर्क साधावा.

प्रत्येक वेळी हतबल होऊन बघत बसणे हे योग्य नाही. लढाऊ मनाचं ते लक्षण देखील नाही. आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल. राजकीय इच्छाशक्ती दाखवण्याची हीच खरी वेळ आहे. वेळीच जागे होऊ या, आपल्या प्रश्‍नांना न्याय देण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या एकजुटीची ताकत वाढवूया.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button