सुरेश देशमुख यांना राज्यस्तरीय गुरूगौरव शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर
सुभाष भोसले-कोल्हापूर
सुरेश देशमुख यांची 15 जून 2006 पासून विद्या मंदिर हाजगोळी खुर्द,ता.आजरा येथे नोकरीची सुरुवात झाली.अगदी लहानपणा पासूनच त्यांनी
कला,क्रीडा,सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटविल्यामुळे त्यांच्यातील गुण त्यांच्यासमोर येणाऱ्या निरागस बालकांच्या मध्ये जास्तीत जास्त कसे रुजवता येतील यासाठी सुरुवातीपासून त्यांनी प्रयत्न केला.आणि याचेच फलित म्हणून त्या शाळेमध्ये प्रत्येक वर्षी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपजत कला गुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला..त्याच बरोबर यामुळे शाळेला शैक्षणिक उठाव चांगल्या प्रकारे करण्यास मदत झाली…
ज्ञानदानाचे कार्य करत असताना त्यांच्या वर्गात एक अनाथ मुलगी असल्याचे समजल्यानंतर तिला दत्तक घेऊन तिचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च करण्याचे सुभाग्य त्यांना लाभले..
त्याचप्रमाणे सन 2012 मध्ये जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी नव्याने सुरु केलेल्या निवासी क्रीडा प्रशालेसाठी संपूर्ण जिल्ह्यातून 105 विद्यार्थी निवडले गेले त्यामध्ये फक्त त्यांची इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी कु.सानिका उत्तम गुंजकर ही अशी होती जिची निवड इतक्या लहान वयात झाली होती.
2016 पासून ज्यावेळी आपल्या कोल्हापूर जिल्हयामध्ये डिजिटल शाळा तयार करण्याची मोहिम आली त्यावेळी हाजगोळी खुर्द ही शाळा आजरा तालुक्यामध्ये पहिली शाळा 100% डिजिटल करण्याचा मान त्यांना मिळाला आणि अशा चांगल्या कामामुळे 2017 मध्ये त्यांना आविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर यांचा जिल्हा गुणवंत पुरस्कार मिळाला आहे.. त्याच बरोबर 2018 मध्ये 100% डिजिटल शाळा उपक्रमांसाठी कोल्हापूर जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या शुभहस्ते भैरेवाडी ता. आजरा येथे त्यांचा सत्कार करून पाठीवर शाबासकीची थाप देण्यात आली. त्यानंतर मे 2018 पासून विद्या मंदिर गणेशवाडी येथे ते बदलीने रुजू झाले आणि तिथेही विविध उपक्रम राबवून आणि स्पर्धा परीक्षेवर विशेष भर देण्याचे त्यांचे काम सुरु आहे.हे करत असतानाच सहकारी सौ.रुपाली कुंभार यांच्या सहकार्याने गणेशवाडी शाळा तंबाखू मुक्त शाळा करण्याचा बहुमान देखील त्यांना मिळाला आहे..
वरील शैक्षणिक,कला,क्रीडा आणि सांस्कृतिक कार्या बरोबरच ते सामाजिक क्षेत्रात ही अग्रेसर असून आजरा तालुक्यातील संवेदना फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत ..आणि त्याच बरोबर सहकार क्षेत्रात ही उत्कृष्ठ काम करून इतक्या कमी वयात आजरा तालुका पंचायत स्तरावरील सेवक पत संस्था आजरा या 10 ते 12 कोटी भागभांडवल असणाऱ्या संस्थेचे चेअरमन म्हणून ते सध्या कर्यरत आहे….
या सर्व कार्याची दखल घेऊन मनुष्यबळ विकास सेवाभावी अकादमी (रजि.ट्रस्ट) मुंबई यांचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक, गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर झाला असून तो डिसेंबर 2019 मध्ये मुंबई येथे वितरित केला जाणार आहे.ते म्हणतात की, असे सर्वगुण संपन्न कार्य करण्यासाठी त्यांचे स्वर्गवाशी आई आणि वडील यांचे आशीर्वाद नेहमीच सोबत असतात त्याच बरोबर सौभाग्यवती रेश्मा आणि चिरंजीव स्वरल हे ही पहाडासारखे सतत मागे उभे असतात..त्याचबरोबर त्यांचे भाऊ,बहीण सर्व नातेवाईक यांची प्रेरणा सतत असते.आणि सर्वात महत्वाचे गुरुबंधू महेश शिंदे आनंदा कुंभार,सुधाकर प्रभू ,कुंड़लिक पाटील (पोलीस पाटील हाजगोळी खुर्द ) आणि त्यांचे सर्व शिक्षक मित्र सजय भोसले अरविंद पुलगुर्ले,प्रकाश बडे,प्रकाश गुट्टे,दिपक कांबळे,सोने ,मदन देसाई यांचे त्यांना सतत प्रोत्साहन मिळते…त्यांना राज्यस्तरीय गुरूगौरव शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर झाल्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






