Pune

महाआघाडी उमेदवार अश्विनी नितीन कदम यांच्या प्रचारार्थ डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘ रोड शो ‘चे आयोजन

महाआघाडी उमेदवार अश्विनी नितीन कदम यांच्या प्रचारार्थ डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘ रोड शो ‘चे आयोजन

राहुल खरात

परिवर्तनाच्या आणि विकासाच्या लढाईमध्ये खांद्याला खांदा देऊन लढणारे आमचे बंधुतुल्य नेतृत्व लोकप्रिय खासदार #डॉ. #अमोल_कोल्हे येत आहेत आपल्या भेटीला… रयतेचे राज्य उभा करून सर्वसामान्य नागरिकांना दहशतीपासुन मुक्त करण्यासाठी ज्यांनी लोकशाहीचा पाया रचला असे जगत वंदनिय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला खरा इतिहास मालिकेच्या माध्यमातून जनसामान्यांनासमोर आणणारे डॉ . अमोल कोल्हे यांचा रोड शो रविवार , दिनांक 13 ऑक्टो. 2019 सकाळी 9.00 वाजता हिंगणे चौक , ब्रह्म हॉटेल सिंहगड रोड या ठिकाणाहून सुरू होणार आहे .

या रोड शो चे मार्गक्रमण ब्रह्म हॉटेल चौक , सिंहगड रोड , जनता वसाहत परिसर , पर्वती गाव परिसर , पर्वती दर्शन परिसर , लक्ष्मीनगर परिसर , सहकारनगर परिसर , अरण्यश्वर परिसर , पद्मावती परिसर , तळजाई वसाहत परिसर , चव्हाणनगर परिसर , संभाजीनगर परिसर , इंदिरानगर परीसर , अप्पर इंदिरानगर परिसर , महेश सोसायटी चौक परिसर , बिबवेवाडी – कोंढवा रोड परिसर , गंगाधाम परिसर , हमाल नगर परिसर , मार्केट यार्ड , श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर , महर्षीनगर परिसर गुलटेकडी परिसर , सुजय गार्डन या ठिकाणी रोड समाप्त होणार आहे .

या परिवर्तनाच्या लढाईमध्ये आपल्या पर्वती कन्याला साथ देण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने पर्वती मतदारसंघांमध्ये लोकशाहीच्या माध्यमातून सुराज्य स्थापन करण्यासाठी मोठ्या संख्येने सामील व्हा असे अवाहन राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवार अश्विनी नितीन कदम यांनी केले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button