दौलतराव देसाई यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश
तुकाराम पाटील
युवानेते दौलतराव देसाई यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचे स्वागत केले .दौलतराव देसाई म्हणाले की ,पंधरा वर्षे एकनिब्ठपणाने जनतेची सेवा केली पण आमच्या पाठीत खंजीर खुपसला त्यामुळे आता आम्ही समोरासमोर लढाई करणार आणि दक्षिणमध्ये अमल महाडिकांना गुलाल लावल्याशिवाय राहणार नाही .दौलतराव देसाई परीवारावर प्रेम करणाऱ्या वीस हजार लोकांचा रविवारी मेळावा घेणार असून या मेळाव्याला दादांनी यावे अशी विनंती त्यांनी यावेळी केली येथून पुढे दादांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष कोल्हापूरात वाढविणार असून अमल महाडिक यांना विजयी करण्याचा निर्धार युवा नेते दौलतराव देसाई यांनी व्यक्त केला.यावेळी चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की,दौलतराव देसाई यांचा पाठींब्यामुळे अमल महाडिक यांचा विजयाचा मार्ग सुकर होणार आहे.
यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष धनजय महाडिक,पश्चिम देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव,अमल महाडिक,जिल्हापरिषद अध्यक्षा सौ शौमिका महाडिक, कोल्हापूर जिल्हा भाजपाध्यक्ष राहूल चिकोडे,संदीप देसाई,भगवान काटे,संगीता खांडे आदी मान्यवर उपस्थित होते.






