महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आंतरराष्ट्रीय पूरस्कार जाहीर : अमेरीकेत होणार सन्मान…
कोल्हापूर प्रतिनिधी : सुभाष
भोसले
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेले तीन दशकांपासून महाराष्ट्रात व देशातील काही राज्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करण्याचे कार्य संघटितपणे करीत आहे
समितीच्या या कार्याची दखल घेऊन अमेरीकेतील ‘फ्रीडम फ्राॅम रिलिजन फाऊंडेशन’ या संघटनेतर्फे ‘अविजीत राॅय करेज अवार्ड ‘ हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
स्मृती चिन्ह व पाच हजार डॉलर्स असे पुरस्काराचे स्वरूप असून दिनांक १८, १९, व २० आॅक्टोंबर २०१९ रोजी अमेरीकेतील शिकागो जवळील मेडीसन या शहरात होणार्या ४२ व्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात हा पुरस्कार सन्मानपूर्वक दिला जाणार आहे
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील उपस्थित राहणार आहेत. त्याच्यासोबत अंनिसचे सक्रिय कार्यकर्ते डॉ. श्रेयस भारूळे ही उपस्थित राहणार आहेत, या दौऱ्यात समविचारी संघटनाच्या भेटीही होणार आहेत.






