विक्की खोकरेच्या विनामुल्य सेवेमुळे एरंडोलच्या सैनिकाच्या पत्नीला मिळालं जीवनदान…!
एरंडोल – देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळे आज आपण सुरक्षित जीवन जगत आहोत. एकीकडे सर्वत्र देशभक्तीचे वातावरण असताना एका निवृत्त सैनिकाच्या पत्नीला अचानक हृदयाचा त्रास जाणवू लागला त्यांची तपासणी केली असता त्याच्या हृदयात छिद्र असल्याचे डॉक्टरांनी सांगितले तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला परंतू आरोग्य दूत विक्की खोकरे हा नेहमीप्रमाणे लागलीच धावून आल्यामुळे शिर्डी साईबाबा हॉस्पिटल येथे त्वरित उपचार झाल्याने या महिलेला जीवनदान मिळालं आहे.
विखरण येथील सेवानिवृत्त फौजी मोहन ठाकूर यांच्या पत्नी मंगलाबाई यांना अचानक हृदयविकाराचा त्रास सुरू झाला, स्वातंत्र्य दिनाच्या जल्लोषात सर्वत्र देशभक्तीच वातावरण असताना विक्की खोकरे यांनी माजी सैनिकाच्या कुटुंबीयांना मदतीचा आधार दिला. शिर्डी येथे स्वता रुग्ण घेऊन
त्वरेने पोहचवले,तेथे विनामूल्य हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. हृदय रोग तज्ञ डॉ. संदीप देवरे यांनी यशस्वीपणे उपचार केले आणि ठाकूर यांच्या पत्नीला नवीन जीवनदान मिळाले आहे.
विक्की खोकरे हे तालुक्यातील सैनिकांनाच्या कुटुंबांना आपली रुग्णवाहिकाची सेवा देखिल विनामुल्य देत असतात त्याचा या अभिनव कार्याचा सर्वत्र कौतुक होत आहे.






