Pune

बाळूमामांच्या तळावर आषाढी एकादशी सोहळा उत्साहात साजरा

बाळूमामांच्या तळावर आषाढी एकादशी सोहळा उत्साहात साजरा

प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे:श्री संत बाळूमामा देवालय आदमापूर ट्रस्ट बग्गा नंबर चार चा आषाढी एकादशी सोहळा 2022 मोठ्या भक्ती भावाने निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे पार पडला. त्यावेळी विविध कार्यक्रम आयोजित केले होते.

रविवारी दिनांक १० रोजी रोजी सकाळी 8.30वाजता आरती व महाप्रसाद दुपारी 1 ते 6 वालुग कार्यक्रम संध्याकाळी 6.30 ते 9 वाजता ह.भ.प. अमोल सूळ महाराज मोरोची नातेपुते यांचे कीर्तन आयोजित केले होते. तसेच रात्री 10 ते 1 वाजता मायक्का ओवीकार मंडळ शाहीर रामचंद्र भोसले वडुजकर यांचा धनगरी ओव्याचा कार्यक्रम पार पडला.
आज सोमवार 11 रोजी पहाटे 4 ते 5 श्रींची महापूजा सकाळी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली व संध्याकाळी लालाचंद चोपडे महाराज यांच्या किर्तनाने आषाढी सोहळा पार पडला. यावेळी आबाल वृद्ध महिला पुरुष भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
हा सोहळा पार पाडण्यासाठी बग्गा नंबर 4 चे कारभारी बाळूमामा शिनगारे उपकारभारी राजू काटेंकर युवराज पाटील व त्यांचे सहकारी यांनी फार मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button