Solapur

राज्यसरकारचा निषेध करत पत्रकार सुरक्षा समितीचे काळ्या फिती लावून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

राज्यसरकारचा निषेध करत पत्रकार सुरक्षा समितीचे काळ्या फिती लावून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

प्रतिनिधी
रफिक अत्तार

सोलापूर पत्रकार सुरक्षा समिती वतीने पत्रकार संरक्षण कायदा ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे शासकीय जाहिराती पत्रकारांवर होणारे धमकी मारहाण हल्ले पत्रकारांवर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याची स्वतंत्र चौकशी राज्यातील यूट्यूब व पोर्टल ला शासकीय मान्यता कोरोना काळात निधन पावलेल्या पत्रकारांच्या वारसास शासकीय मदत मिळण्याबाबत राज्यातील पत्रकारांची नोंदणी यांसह पत्रकारांच्या विविध विषयांवर पत्रकार सुरक्षा समिती वतीने वेळोवेळी आंदोलन उपोषण निवेदन व पत्रव्यवहार करून देखील राज्यसरकार ने पत्रकारांचे प्रश्न न सोडविल्याने तसेच राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नांवर राज्यसरकारचे कमालीचे दुर्लक्ष असल्याने प्रजासत्ताकदिनी पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यसरकार चा निषेध करत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या नावे सोलापूरच्या जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले ,
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्यसरकार वर टीकास्त्र सोडलं असून पत्रकारांच्या प्रश्नांबाबत प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी राज्यसरकार वर शेलक्या भाषेत टीका केले आहे यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष वैजिनाथ बिराजदार जिल्हा उपाध्यक्ष सादिक शेख जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नागनाथ गणपा शहर अध्यक्ष राम हुंडारे शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी (BS) शहर प्रसिद्धी प्रमुख अक्षय बबलाद मोहम्मद इंडिकर इम्तियाज अक्कलकोटकर रोहित घोडके प्रसाद ठक्का इम्रान साचे सूर्यकांत व्हनकडे भागप्पा प्रसन्न सतीश गडकरी आदी पत्रकार उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button