Pune

मोठी बातमी: शासकीय परीक्षांच्या प्रश्न पत्रिका फुटल्या…आरोग्य विभागाबरोबरच आर्मी च्या प्रश्न पत्रिकांचाही समावेश..!

मोठी बातमी: शासकीय परीक्षांच्या प्रश्न पत्रिका फुटल्या…आरोग्य विभागाबरोबरच आर्मी च्या प्रश्न पत्रिकांचाही समावेश..!

पुणेः महाराष्ट्रात अनेक शासकीय प्रवेश परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.समोर आलेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये एक अनोळखी व्यक्ती परीक्षेच्या उमेदवाराशी बोलत असून परीक्षेच्या पेपरबाबत चर्चा होत आहे आणि त्यासाठी किती किंमत मोजावी लागेल याबाबत चर्चा केली जात आहे. हा फोन पिंपरी-चिंचवड किंवा पुणे शहरातील असल्याचे सांगण्यात येत असून पोलिसांनी घटनेची दखल घेतली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, पेपरफुटीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या गटाने महाराष्ट्रात एक नव्हे तर अनेक परीक्षांचे पेपर लीक केले आहेत. या पेपर फुटीमध्ये ह्या विभागाच्या परीक्षांचा समावेश आहे- आरोग्य विभाग परीक्षा,लष्कर परीक्षा, पोलीस भरती आणि इतर. रायगड, पिंपरी-चिंचवड, पुणे, नायगाव या भागात पेपर फुटल्याच्या घटना घडल्या आहेत.

ऑडिओ क्लिपवरून असे दिसते की, फोनवर बोलत असलेली व्यक्ती शिकवणी वर्गाचा प्रमुख आहे. ज्या परीक्षांचे या गटाने पेपर लीक केले, त्यामध्ये राष्ट्रीय सैन्याच्या परीक्षा आणि महाराष्ट्रात या महिन्यात झालेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षा आहेतय. मात्र, पोलीस सांगत आहेत की आम्ही घटनेची दखल घेतली आहे, परंतु कोणतेही पुरावे नाहीत.

पेपरफुटीचे रॅकेट भारतात नवीन नाही. मात्र, पोलीस विभागाकडून ते का थांबवले जात नाही, हा प्रश्न आहे. असे सरकारी किंवा खाजगी परीक्षेचे पेपर फुटणारे अनेक गट तुरुंगात आहेत, पण तरीही इतर सदस्य सक्रिय आहेत. महाराष्ट्रात अनेक वेळा पुढे ढकलल्यानंतर अखेर या महिन्यात आरोग्य विभागाच्या परीक्षा घेण्यात आल्या. पण परीक्षेचे पेपर फुटले आणि एका पेपरसाठी लोकांनी हजारो रुपये मोजले. याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती कशी नव्हती, ही धक्कादायक बाब आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button