प्रहार संघटनेचे पारोळा गट विकास अधिकारी ना साकडे
प्रतिनिधी प्रविण पाटील-
अपंग बांधवांच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या समस्या ना फक्त आणि फक्त शासकीय अधिकारी च जबाबदार अपंगांच जीवन सुखमय व्हावं ह्या साठी शासनाने विविध जी आर परित केलेत परंतू त्याची अंबलाबजावणी होताना दिसून येत नाही वारंवार निवेदन देउन सुधा अधिकारी काना डोळा करताना दिसून येत आहेत सरकार सुस्त अधिकारी मस्त जनता त्रस्त अशीच जणू सध्या परिस्थती दिसून येत आहे अपंग बांधवांना दिल्या जाणाऱ्या शासकिय योजनाचा लाभ अधिकारी वर्गाच्या निषकाळजी पना मुळे अपंग बांधवांना विविध समस्या ना सामोरे जावे लागत आहे अपंग बांधवांना मिळणारा पाच टक्के निधी हा दरवर्षी राखून ठेवला जातो परंतू तो निधी अजून ही पारोळा तालुक्यातील बऱ्याच श्या गावातील ग्राम पंचायतीनी वाटप केला नाही अश्या व्यथा पारोळा तालुक्यातील अपंग बांधवानी प्रहार संघटनेचे जळगांव उपजिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या कडे केल्या याची तात्काळ दखल घेत प्रहार संघटनेचे उपजिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष हेमंत महाजन, तालुका उपाध्यक्ष राजमल वाघ,विजय वाघ, सचिव प्रकाश पाटील, शहर अध्यक्ष शकील शेख यांनी पारोळा गटविकास अधिकारी समाधान लोंढे यांना निवेदन दिले, निवेदनात अपंग बांधवांचा पाच टक्के निधी त्वरित वाटप करण्यात यावा, अपंग बांधवांना ड यादीत समावेश करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला जावा असे विविध मागण्या न च पत्र आज गटविकास अधिकारी यांना प्रहार अपंग क्रांती संघटने कडून देण्यात आले.






