Aurangabad

विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास गेलेल्या महावितरण अधिकारी व कर्मचार्‍याला ग्रामस्थांकडून मारहाण

विद्युत पुरवठा सुरळीत करण्यास गेलेल्या महावितरण अधिकारी व कर्मचार्‍याला ग्रामस्थांकडून मारहाण

महावितरण अधिकारी व कर्मचारी संघटनांचे कामबंद आदोलंन

गणेश ढेंबरे / औरंगाबाद

वैजापूर तालुक्यातील भऊर, हिंगोणी व नारायणपुर या तीनही गावांच्या लाईटच्या वादातुन हिंगोणी येथील ग्रामस्थांकडून भऊर गावाचा चालु विद्युत पुरवठा रविवारी येथील ग्रामस्थांकडून खंडित करण्यात आला. यामुळे पुढील लाईन बंद झालेल्या संतप्त झालेल्या भऊर येथील ग्रामस्थांनी महावितरण चे लाडगाव येथील उपकेंद्रात घेराव घातला व आमची बंद केलेली लाईन पुर्ववत चालु करण्याची मागणी केली. तर हिगोणी येथे ग्रामस्थांकडून बंद केलेली लाईन जोडण्यासाठी सायंकाळी गेलेल्या महावितरण कर्मचार्‍यांना येथील ग्रामस्थांनी दाबून ठेवून अधीकारी घटनास्थळी बोलविण्याचा हट्ट घटनास्थळीच आलेल्या पोलीसाकडे धरला. यावेळेस घटनेची माहीती महावितरण चे उपकार्यकारी अभियंता राहुल बडवे यांनी रात्री नऊ वाजेदरम्यान वैजापुर पोलिसांना घटनेबाबत कळवुन हिंगोणी येथे भेट देत तेथे असलेल्या महावितरण कर्मचाऱ्याची सुटका ग्रामस्थांच्या तावडीतून केली.

बंद केलेली लाईन पुन्हा जोडुन देण्याची ग्रामस्थांना कळवुन दोन दिवसांत तुमच्या सर्व मागण्या मान्य करू व यावेळेस लाईन चालु करीत असतानाच हिगोणी येथील, सुनील गिर्हे, काकासाहेब चंदने, नाना बोडके, बाळु काळे, मदन थोरात, सुरेश मिटकर, मनोज काळे सर्व राहणार हिंगोणी यांनी काठी घेऊन घटनास्थळी असलेले उप अभियंता राहुल बडवे, वरिष्ठ तंत्रज्ञ पवन महेर, अनिल वाळुजं, अफसर सय्यद, दिपक डुकरे असतांनाच त्यांना शीवीगाळ करीत मारहाण केली यानतंर घटनेची माहीती मिळताच गावातच असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महावितरण अधिकारी व कर्मचार्‍यांची ग्रामस्थांच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर सदरील गावाचा विद्युत पुरवठा तसाच बंद पडुन राहीला. यावेळेस पोलीस व महावितरण कर्मचार्‍यांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालयात हलवले.

रात्री दोन वाजेदरम्यान वैजापुर पोलीस ठाण्यात याप्रकरणी वरील नावे असलेल्या आरोपींविरूध्द सरकारी कामात अडथळा आनुन गैर कायद्याची मंडळी जमवुन जिवे मारण्याचा प्रयत्न करने, विद्युत कायदा 2003 अन्वये कलम 138 आदी विविध कलमांनुसार वैजापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, असून सोमवारी सकाळपासून महावितरण कर्मचारी व अधिकारी यांनी कामबंद आदोलंन करीत उपोषण सुरू केले, असून दोषींवर तत्काळ कारवाई होऊन अटक होईपर्यंत कामबंद आंदोलन व उपोषण सुरूच राहणार असल्याचे महावितरण कर्मचार्‍यांनी कळवले आहे.

संबंधित लेख

Back to top button