“जे करतो ते भल्यासाठी” या विनोदी लोकनाट्याचा मुहूर्त दणक्यात संपन्न …!
राहूल खरात
विजयादशमी” च्या शुभ मुहूर्तावर हरहुन्नरी अभिनेता -लेखक -दिग्दर्शक मा.बबन जोशी यांच्या “जे करतो ते भल्यासाठी ” या विनोदी लोकनाटयाचा शुभ मुहूर्त
मंगळवार दिनांक ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ .०० वाजता कामाठिपुरा, ५ वी गल्ली , मुंबई ४००००८ येथे लोकप्रिय समाजसेवक तसेच निर्भीड पत्रकार मा.राजेंद्र शंकर लकेश्री यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी सिने नाट्य कलाकार -दिग्दर्शक महेश्वर तेटांबे , हर्षल राजेंद्र लकेश्री , लेखक -दिग्दर्शक बबन जोशी , कृष्णा खेडकर ,सचिन सावंत , धीरज टकले , प्रदीप म्हात्रे , संदीप जाधव , सोहम पंधे , ओम कांबळी , दिगंबर सोनवडेकर
आदी मान्यवर कलाकार उपस्थित होते. आपल्या अतिथीपर भाषणांत लकेश्री यांनी या लोकनाट्यासाठी जी काही मदत लागेल ती मी करेन असे आश्वासन देऊन हौशी कलावंतांना मोलाचे मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे तालमीसाठी माझे कार्यालय मी विनामूल्य देत आहे असे ही याशुभ प्रसंगी त्यांनी जाहीर केले. दिग्दर्शक महेश्वर तेटांबे यांनी हौशी कलावंतांना वेळेचं महत्व पटवून देऊन नाटकांसाठी पुरेपूर वेळ दिल्याने नाटक नक्कीच बहरू लागेल. लोकनाट्यचे लेखक -दिग्दर्शक बबन जोशी यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत प्रशांत दामले , दिवंगत नटश्रेष्ठ सतीश तारे यांचा अभिनय बघत बघत मी इथपर्यंत पोहोचलो आणि यांच्यामुळेच मी घडलो, आणि तुमची साथ असेल तर नक्कीच या लोकनाट्यचे दमदार प्रयोग करेन असे सांगून उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले.
धन्यवाद
महेश्वर भिकाजी तेटांबे
(दिग्दर्शक -पत्रकार)
९०८२२९३८६७






