वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत युवा सेनेचा आज संवाद मेळावा
संजय कोल्हे जालना
जालना : राज्याच्या दौऱ्यावर असलेले युवा सेनेचे सचिव वरून सरदेसाई हे उद्या मराठवाड्यात येत असून त्यांच्या उपस्थितीत गुरूवारी ( ता. १२)दुपारी चार वाजता अंबड रोड वरील मातोश्री लॉन्स मंगल कार्यालयात युवा सेना पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भाग्यनगर येथील संपर्क कार्यालयात युवासेना राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली . माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना युवा सेनेचे संघटन वाढविण्यासाठी तसेच संघटनेची शक्ती दाखविण्यासाठी सदर मेळावा यशस्वी करावा असे आवाहन केले.
युवासेना राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर यांनी जालना शहरासह जिल्हा तालुका, तसेच गट व गण निहाय गावपातळीवरील पदाधिकाऱ्यांनी तळागाळापर्यंत जाऊन मेळाव्याची माहिती देऊन युवा सैनिकांना मेळाव्यास उपस्थित राहण्याबाबत रचना करावी,असे सांगितले.
दरम्यान मेळावा यशस्वी करण्याच्या दृष्टीने युवा सेनेतर्फे जोरदार तयारी करण्यात आली असून शिवसेना, महिला आघाडी ,दलित आघाडी ,अल्पसंख्यांक सेना, भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी ही परिश्रम घेत आहेत.
युवा सैनिकांनी मोठ्या संख्येने संवाद मेळाव्यास उपस्थित रहावे .असे आवाहन युवा सेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे ,जिल्हा समन्वयक भरत सांबरे, अंकुश पाचफुले, उपजिल्हाप्रमुख अमोल ठाकूर ,गणेश काळे, विनायक चोथे, शहरप्रमुख योगेश रत्नपारखे, दुर्गेश काठोठीवाले ,विक्रम कुसुंदल ,तालुकाप्रमुख गणेश मोहिते, अजय कदम, दिगंबर बोराडे, दत्ता भंगाळे , नागेश डवले, दिलीप वाडेकर, राम लांडे, राजू घोगरे, संतोष जाधव, सागर पवार, शुभम कोरडे, कृष्णा कोल्हे, प्रसाद चव्हाण, नवनाथ दौंड किरण राजे कोथळकर यांच्यासह पदाधिकारी व युवा सेनेच्या वतीने करण्यात केले आहे.
________________
टिप : फोटो सोबत पाठवला आहे.
________________