अमळनेर शहरावर रोगराई आणि डेंगू मरीमातेचा फेरा…
तुले डेंगू लागावं व्हता व जनता ..अमळनेर
शहरात सध्या डेंगू आणि इतर आजारांची लागण झाली असून शहराची स्वच्छतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
पावसाळ्यात अनेक ठिकाणी डबके, गटारी तुडुंब भरलेल्या,सफाईची कमतरता,जन्तु नाशक फवारणीचा अभाव इ कारणांमुळे शहरात अस्वछतेने कळस गाठला असून नागरिकांना पूर्णपणे कर भरूनही सुविधा उपलब्ध होत नाही. डेंगू चा एक बळी घेतल्या नंतर आणि महाराष्ट्र मराठी 7 ने लावलेल्या बातमी नंतर फवारणी करावी लागते
याची आठवण नगरपरिषद अधिकारी आणि कर्मचारी यांना आली.
जन्तु नाशके खरेदी आणि झालेला उपयोग याचा हिशोब जनतेने नागरपरिषदे कडे का मागू नये.भारत सरकारने राबविलेल्या स्वछता मोहिमे अंतर्गत फक्त फोटो काढून बिले काढणे आणि खोटे पुरस्कार मिळवणे हेच ध्येय सध्या दिसून येत आहे. पुरस्कार कोणत्या निकषांवर मिळाला यावरही एकदा नागरिकांनी विचारपूस करणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो नागरिकांचा मूलभूत हक्क आहे.
अनेक नागरिकांनी त्यांच्या शी चर्चा केल्या नंतर तक्रार करायला गेलो तर अधिकारी जागेवर नसतात,खूपदा रजेवरच असतात,दुपारी तीन वाजेचा टाइम हा कोणी निश्चित केला आहे?सकाळी 11 वाजता येऊन तीन वाजता परत येण्याचा वेळ कोणी लागू केला?बर तीन वाजता कोणीच हजर राहत नसल्याचं ही नागरिकांनी सांगितलं.चार वाजेपर्यंत येऊन पाच वाजता निघून जातात अशीही तक्रार केली आहे. फिल्ड वर्क च्या नावाखाली बाहेर गेले आहे असे सांगितले जाते. हालचाल रजिस्टर ची नागरिकांनी मागणी केली असता ती उडवून लावण्यात आली आहे.अश्या अनेक गोष्टी नागरिकांशी केलेल्या चर्चेतून समोर आल्या आहेत.
सफाई कामगार त्यांचं काम व्यवस्थित पार पाडतात परंतु त्यांचं नियोजन चुकत आहे.त्यांच्या कडून नियोजन बद्ध काम करून घेण्यात पुरस्कार प्राप्त अधिकारी कमी पडत आहेत. असे निदर्शनास आले आहे. नागरिकांनी खूप चांगल्या कार्याची अपेक्षा केली होती परंतु नागरिकांची निराशा मात्र निश्चित पणे झाली आहे.
इतर अनेक गोष्टी आहेत की ज्या सामान्य नागरिकांना ज्ञात नाहीत परंतु अभ्यासू लोकांना त्याची माहिती आहे आणि लवकरच त्या सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत.
सध्या हा मरीआईचा फेरा मात्र नागरिकांसाठी डोके दुखी ठरला असून सणा सुदीच्या दिवसांत त्यांना दवाखान्याच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत.






