Pune

ट्रायबल फोरम खेड तालुका कार्याध्यक्ष पदी तानाजी भोकटे यांची निवड

ट्रायबल फोरम खेड तालुका कार्याध्यक्ष पदी तानाजी भोकटे यांची निवड

पुणे : प्रतिनिधी दिलीप आंबवणे

पुणे जिल्ह्यात सामाजिक कार्यात नेहमिच सक्रिय असलेले खेड तालुक्यातील खरपुड येथील तानाजी भोकटे यांची ट्रायबल फोरम खेड तालुका कार्याध्यक्ष पदी यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र ट्रायबल फोरम चे पुणे विभागीय अध्यक्ष दिलीप आंबवणे यांनी दिले.
हे संघटन आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी ,अस्तित्व, अस्मिता आणि आत्मसन्मानासाठी तसेच संस्कृतीचे जतन व संवर्धन करुन,सांस्कृतिक घुसखोरी रोखण्यासाठी ट्रायबल फोरम या कँडरबेस शिस्तबध्द,वैचारिक असलेल्या फोरमची निर्मिती झाली असून समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी विविध पातळ्यांवर काम करीत आहे. वैचारिक व शिस्त असलेल्या संघटनमध्ये निवड झाल्यामुळे परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे.
ते आपल्या निवडीचे श्रेय ट्रायबल फोरम चे जिल्हाध्यक्ष रोहित सुपे, शांताराम फोडसे, अनिल तळपे, दवदीप गवारी, राजिव आंबेकर यांना देतात.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button