Amalner

अमळनेर येथील माजी नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांचा  राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीतू अनिल चौधरी यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश….

अमळनेर येथील माजी नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांचा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीतू अनिल चौधरी यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश….आज मुंबई येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नामदार.श्री.बच्चूभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अनिलजी गावंडे प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी यांच्या पुढाकाराने अमळनेर येथील माजी नगरसेवक गुलाबबापू पाटील सह प्रमुख नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला.या वेळी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू म्हणाले प्रहार जनशक्ती पक्ष हा कार्यकर्त्यांना बळ देणारा, आधार देणारा, पाठिंबा देणारा पक्ष आहे. अध्यक्ष या नात्याने सर्वांचे स्वागत करतो प्रहार पक्षाचे काम जोमाने आणि ऊर्जा ने करूया ही सदिच्छा..प्रहार पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी या पुढे म्हणाले जळगांव जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत. पक्षात नव्याने आलेल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आता ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकत्रित प्रयत्न करू. गरज पडली तर लढाही देऊ. पण गोरगरिबांच्या सेवेसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करू.या प्रसंगी अमळनेर माजी नगरसेवक गुलाब पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी मित्रपरिवार अध्यक्ष उपसरपंच रवींद्र पाटील, देवा ग्रुप शहराध्यक्ष दिनेश पाटील, छावा संघटना उत्तर महाराष्ट्र प्रमुख हिरामण पाटील, माजी सरपंच वावडे डॉ.दत्तात्रय ठाकरे, माजी उपसरपंच मुडी प्र डोंगरी अरुण पाटील, ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील, शिवसेना विभाग प्रमुख जवखेडा भिकन पाटील, गोकुळ कोळी, समाधान पाटील, किशोर पाटील, छत्रपती सेना जळगाव जिल्हाध्यक्ष चिन्मय पाटील, ग्रामपंचायत सदस्य लोण खुर्द बापूराव पाटील, प्रवीण पाटील, यांच्या सह प्रमुख नेते पदाधिकारी माजी आमदार शिरीष चौधरी मित्र परिवारातील सदस्यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button