Parola

पारोळा तहसील कार्यालयातआमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते अपंग बांधवांना अंत्योदय रेशन कार्ड वाटप कार्यक्रम संपन्न

पारोळा तहसील कार्यालयातआमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते अपंग बांधवांना अंत्योदय रेशन कार्ड वाटप कार्यक्रम संपन्न


प्रवीण पाटील पारोळा

पारोळा : शासनाच्या योजनेनुसार अपंग बांधवांना अंत्योदय रेशन योजनेचा लाभ दिला जावा व अपंग बांधवांना ही सर्वसामान्य माणसांन सारख जीवन जगता यावं ह्या साठी राज्याचे पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अपंग बांधवांना अंत्योदय रेशन कार्ड मिळाव ह्या संबधित जी आर पास केला होता पण प्रत्यक्ष कार्यवाही होताना दिसून येत नव्हती या संबधित प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी तहसीलदार अनिल गावंडे यांना निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा केला व आज 26/07/2021 रोजी पारोळा तालुक्याचे शिवसेने चे आमदार चिमनराव पाटील यांचे हस्ते अपंग बांधवांना रेशन कार्ड वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला ह्या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर तहसीलदार अनिल गवांदे नायब तहसीलदार शिंदे,पुरवठा अधिकारी,दिव्यांग शक्ती चे प्रतिनिधि प्रविण काटे,प्रहार रुग्ण सेवक महेश मोरे, व राज्य अपंग कर्मचारी संघटना अध्यक्ष रवींद्र पाटील, व पारोळा तालुक्यातील अपंग बांधव उपस्थित होते कार्यक्रमाला संबोधताना आमदार चीमनराव यांनी अपंग बांधवांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात अशा सूचना तहसीलदार साहेब यांना दिल्या

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button