Amalner

एकलव्य संघटना जिल्हाध्यक्ष श्री. सुधाकरराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्राम गृह अमळनेर येथे आढावा बैठक संपन्न

अमळनेर : आज दिनांक २३/०७/ २०२१ वार शुक्रवार रोजी एकलव्य संघटना अमळनेर तालुका कमिटी आढावा बैठक शासकीय विश्राम गृह अमळनेर येथे एकलव्य संघटना जिल्हाध्यक्ष श्री. सुधाकरराव वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली व गेल्या एक दोन वर्षांपासून अमळनेर तालुका कमिटीचे सर्व पद रिक्त ठेवण्यात आले होते आज ह्या सर्व रिक्त पदे नवनिर्वाचित पदाधिकारी यांची निवड जिल्हाध्यक्ष व आदिवासी भिल्ल समाज बांधव यांच्या उपस्थितीत व सर्वांच्या सहमतीने करण्यात आली.तसेच सर्व उपस्थित नवनिर्वाचित पदाधिकारी व आदिवासी भिल्ल समाज बांधव संघटनेचे कार्यरते यांना जिल्हाध्यक्ष श्री सुधाकरराव वाघ यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करत असतांना त्यांनी उपस्थित वेगवेगळ्या गावातील सर्व समाज बांधवाच्या समस्या ऐकून घेतल्या सर्व समाज बांधवाच्या समस्या ह्या सगळ्या एक समान असल्याचे एकांतरी दिसून आले. त्यांत दफनभूमी,राहत्या घरच्या जागा रेशनकार्ड जातीचे प्रमाणपत्र ह्या मुख्य समस्या दिसून आल्यात यावेळी चर्चा करत असतांना जिल्हाध्यक्ष श्री सुधाकरराव वाघ म्हणालेत कि आज अनेक वर्षे पूर्ण झाली आहेत स्वातंत्र्य मिळवून भारताला तरी देखील आपल्या आदिवासी भिल्ल समाजाची प्रश्न सुटलेली दिसत नाही आजही खऱ्या अर्थाने संविधानिक न्याय आपल्याला मिळालेला नाही शासन स्तरावर आणि प्रशासन स्तरावर आजही ह्या गोष्टी ची पूर्तता केलेली दिसत नाही त्या साठी आपल्याला संघटनाच्या माध्यमातून प्रत्येक गावात फुल शाहूे आबेडकर व आदिवासी क्रांतीवीरांचे विचार आज आपल्याला आदिवासी भिल्ल समाजातील प्रत्येक व्यक्ती प्रयत्न होचवायचे आहेत.व आपले सर्व प्रश्न आंदोलनच्या माध्यमातून कसे सोडवून घेता येईल. यावर ही चर्चा ह्या वेळी करण्यात आली. व नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी यांचे जिल्हाध्यक्ष श्री सुधाकरराव वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. अमळनेर तालुकाध्यक्ष म्हणून श्री गुलाब बोरसे याची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष श्री नाना पवार याची निवड करण्यात आली व
श्री लक्ष्मण मोरे ता.संघटक श्री पूनमसिंग मोरे ता.कार्यध्यक्ष श्री विनायक भिल्ल ता.सल्लागार श्री धमेंद्र मोरे ता.सचिव श्री अंकुश सोनावणे ता.सदस्य श्री राजू मालचे ता. युवा अध्यक्ष श्री राहुल मोरे ता.युवा उपाध्यक्ष भैय्या सोनवणे टाइगर फोर्स ता.अध्यक्ष श्री.संजय सोनवणे ता.उपाध्यक्ष तसेच इतर वेगवेगळ्या पदावर नवीन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली या वेळी बैठकिला एकलव्य विध्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष श्री निवृत्ती पवार पारोळा उपाध्यक्ष श्री किशोर वाघ कार्याध्यक्ष श्री सुनिल पवार चोपडा तालुकाध्यक्ष श्री सखाराम सोनवणे उपाध्यक्ष श्री न्यानेश्वर अहिरे संघटक आप्पा साहेब भिल्ल तालुका सचिव सुशिल सोनवणे पारोळा विध्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष श्री गोपाल मालचे व अमळनेर तालुक्यातील आदिवासी भिल्ल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button