पारोळा तालुक्यात युरिया खताचा तुटवडा शेतकरी हवाल दिल
प्रतिनिधि प्रवीण काटे
पारोळा बऱ्याच दिवसानंतर वरून राजा ने जळगांव जिल्हयात हजेरी लावली व शेतीच्या कामाला वेग आला व शेतकरी राजा सुखावला पण पिकासाठी लागणारे रासायनिक खत मात्र कृषी केंद्रांवर उपलब्ध नाही. रासायनिक युरिया खत मिळाव म्हणून शेतकरी हा कृषी केंद्रावर गेल्या नंतर त्यांना युरिया हे रासायनिक खत आमच्या कडे उपलब्ध च नाही अशी उत्तरे दिली व काही दुकानावर युरिया खताची किमती पेक्षा जास्त दर घेउन युरिया खत उपलब्ध करून दिल जात असल्याची माहिती मिळाली आहे.पण ह्या भोंगळ कारभारा मध्ये सर्व सामान्य शेतकरी भरडला जात असून कृषी अधिकारी यांच्याशी चर्चा केल्या नंतर आम्ही ह्या समस्या वर काहीच तोडगा काढू शकत नाही अशी उत्तरे दिली जात आहेत. तर सर्व सामान्य शेतकऱ्या ने आप्ल्या समस्या कुणाकडे मांडाव्यात हा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी शासनाने या संबधित लक्ष घालून ज्या कृषी केन्द्र वर युरिया खत गोडाऊन मध्ये दडपून ठेवलं जातं त्या कृषी केंद्राची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी शेतकरी वर्गाकडून मागणी करण्यात येत आहे.






