Aurangabad

पावसाचा धोका; औरंगाबादकरांनो खबरदारी घ्या, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचे आवाहन

पावसाचा धोका; औरंगाबादकरांनो खबरदारी घ्या, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांचे आवाहन

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांच्या जिवीताचे व मालमत्तेच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातुन जिल्हयातील नागरिकांनी वैयक्तिक खबरदारी घेण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी केले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. जनजीवन विस्कळीत होत आहे. त्या अनुषंगाने औरंगाबादकरांना खबरदारी घेण्यासाठी मोक्षदा पाटील यांनी सूचना केल्या आहेत. नदी लगत राहणाऱ्या तसेच धरण क्षेत्राच्या काठावरिल नागरिकांनी वाढत्या पावसाच्या अनुषंगाने पुर परिस्थीतीच्या दृष्टीकोनातुन प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे पालन करावे.

वेळीच कुटूंबासह सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे. आपत्कालिन क्रमांक स्वत:जवळ बाळगावे. पुरपरिस्थीतीमध्ये अरूंद पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातुन रस्ता ओलांडू नये. वाहन चालविण्याचे धाडस करू नये, ज्यामुळे पुराचे पाण्यात वाहुन जाण्याचा धोका संभावतो. जंगलातुन जाणारे वळण रस्ते, अरूंद घाट, अशा ठिकाणाहून वाहनासह प्रवास करणे पावसाळ्यात टाळावे. अशा ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना अधिक प्रमाणात घडतात ज्यामुळे अशा ठिकाणी अडकून पडण्याचा धोका अधिक संभावतो. त्यामुळे शक्यतो घराबाहेर पडणे व प्रवास करणे टाळावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. घाबरून जाऊ नये. आपत्कालीन परिस्थीतीमध्ये तात्काळ स्थानिक पोलीसांशी किंवा नियंत्रणकक्ष औरंगाबाद ग्रामीण 0240-2381633, 2392151 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button