पंढरपूर

रिलायन्स जिओचे डॉ. मुनीर सय्यद स्वेरीमध्ये इलाईट कार्यक्रम संपन्न

रिलायन्स जिओचे डॉ. मुनीर सय्यद
स्वेरीमध्ये इलाईट कार्यक्रम संपन्न

पंढरपूर– रफिक अतार

‘कामाचे ध्येय ठरवा. त्यानुसार कठोर परिश्रम करा आणि योग्य दिशेने मार्गक्रमण करा. असा प्रवास करत असताना आपल्या ध्येयाचा विसर पडू देवू नका. कारण स्पर्धेच्या युगात वावरताना नवनवीन तंत्रज्ञानाची गोष्टी आत्मसात करणे अत्यंत आवश्यक असते. यासाठी इंटरनेटची मदत घ्या. अनेक माहिती इंटरनेटवरुन अपलोड करून घेतल्यास आपल्या ध्येयाला गती मिळते आणि स्पर्धेच्या प्रवाहात अग्रेसर राहता येते. यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित झाले पाहिजे. भविष्यकाळात इलाईटने हॅकेथॉन सारख्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती करून देणारे उपक्रम राबविल्यास विद्यार्थी प्रेरित होऊन संशोधने करतील.’असे प्रतिपादन रिलायन्स जिओ लॅबचे उपाध्यक्ष डॉ. मुनीर सय्यद यांनी केले.
स्वेरी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील विभागामध्ये इलाईट (इलेक्ट्रोनिक्स लिडिंग इन टेक्नीकल एनरीचमेंट) २ के १९ चे आयोजन केले होते. याच्या उदघाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रिलायन्स जिओ लॅबचे उपाध्यक्ष डॉ. मुनीर सय्यद मार्गदर्शन करत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी.रोंगे होते. दीपप्रज्वलनानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांसाठी ‘हार्डवर्क नेव्हर फेल्स ‘ हा संदेश विद्यार्थ्यांना दिला. प्रास्ताविकात इलाईट स्टुडन्ट फोरमच्या उपाध्यक्षा अंजली येळसंगे यांनी इलाईट उपक्रमाबद्धल सविस्तर माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय विद्यार्थिनी प्रतिनिधी विशाखा चव्हाण यांनी करून दिला. पुढे बोलताना डॉ मुनीर सय्यद म्हणाले की, ‘आलेली आर्थिक मंदी आणि औद्योगिक क्षेत्राच्या पदवीधर अभियंत्यांकडून असणाऱ्या अपेक्षा यातूनच पुढील औद्योगिक क्रांती अवलंबून आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी सखोल ज्ञान घेवून त्याचा ध्येयपूर्तीसाठी पाठलाग करा.’ असे सांगून स्वेरीच्या विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले. स्वेरीचे संस्थापक सचिव अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी पी रोंगे यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी भविष्य उज्वल करण्यासाठी ‘हार्ड वर्क’ करणे गरजेचे आहे. आपले इच्छित ध्येय गाठण्यासाठी ध्येयवेडे होणे गरजेचे आहे.’ विद्यार्थ्यांनी ‘चांद्रयान २’ ची प्रतिकृती अत्यंत सुबक साकारले होते. इलाईट स्टुडन्ट फोरमने आर्ट गॅलरी, प्रोजेक्ट एक्झिबिशन, रॅपिड फायर या उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमांमध्ये यशस्वी विद्यार्थ्याना प्रा. संदीप बिडवाई यांच्या हस्ते पारितोषक व प्रमाणपत्रे देण्यात आली. यामध्ये प्रोजेक्ट एक्झिबिशनमध्ये आशा यादव व पूजा लोखंडे विजेत्या ठरल्या. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ अनुप विभुते यांच्या नेतृत्वाखाली इलाईट स्टुडन्ट फोरमचे अध्यक्ष पांडुरंग मिसाळ, उपाध्यक्ष सुशांत आलदार, उपाध्यक्षा अंजली येळसंगे, सचिव ऋषिकेश मोरे, उपसचिव विशाल पाटील, खजिनदार ओंकार साळुंखे, सहकोषाध्यक्ष मंजुनाथ सरवाडकर यांच्या सहकार्याने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यानी संपूर्ण विभाग इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रामधील तंत्रज्ञांनी सुशोभित केला होता. विद्यार्थ्यानी केलेली सजावट पाहण्यासाठी पदविका अभियांत्रिकीचे विद्यार्थी तसेच मरवडे, सुस्ते, मोहोळ, आटपाडी, लातूर येथील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा, उपाध्यक्ष आर. बी. रिसवडकर, विश्वस्त प्रा सुरज रोंगे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ प्रशांत पवार, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, विद्यार्थ्यानी ‘इलाईट’ प्रदशर्नाची पाहणी करून इलाईटमधील विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुंजन पोतदार व समिता म्याकल यांनी केले तर इलाईटचे समन्वयक प्रा अक्षय जाधव यांनी आभार मानले.
छायाचित्र-१.स्वेरीमध्ये इलाईट कार्यक्रमाचे उदघाटन करताना रिलायन्स जिओ लॅबचे उपाध्यक्ष डॉ. मुनीर सय्यद सोबत डावीकडून ऋषिकेश मोरे, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी पी रोंगे, रिलायन्स जिओ लॅबचे उपाध्यक्ष डॉ. मुनीर सय्यद, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ अनुप विभुते, विद्यार्थी अध्यक्ष पांडुरंग मिसाळ.
२. इलाईटच्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना रिलायन्स जिओ लॅबचे उपाध्यक्ष डॉ. मुनीर सय्यद.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button