आदर्शगाव म्हणजे सर्वांच्या हिताचा सर्वांच्या कल्याणाचा विचार पद्मश्री पोपटराव पवार
केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली आणि शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर द्वारा आयोजित व्याख्यान संपन्न
अमळनेर : केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली आणि शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेचे अकरावे पुष्प म्हणजेच व्याख्यान क्रमांक 11 हे ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री पोपटराव पवार सरपंच हिवरेबाजार यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 18 जुलै 2021 रोजी सायंकाळी 5 ते 6 यादरम्यान गुंफले गेले. अश्मयुगातून माणसाची जसजशी उत्क्रांती होत गेली तस-तसे त्याचे मानवाधिकार जागृत होत गेले. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण हे मूलभूत मानवी अधिकार असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1989 मध्ये खेड्याकडे चला हा महात्मा गांधींचा संदेश मनात जपून त्यांनी हिरवेबाजार या आपल्या गावासाठी काहीतरी करण्याचे संकल्प केले. हिरवे बाजार या गावात त्याकाळी भूक होती ,गरिबी होती, बालमृत्यू दर मोठा होता, बेरोजगार युवक दारूच्या आहारी गेलेला होता, पाण्याची टंचाई होती आणि अशा असंख्य समस्या गावासमोर होत्या. परंतु गावकऱ्यांना विश्वासात घेऊन निस्वार्थ भावनेने कार्य करत गावाचा कायापालट केला. चराईबंदी, कुऱ्हाड बंदी, कुटुंब नियोजन ,नशाबंदी, ओपन ग्रीजिंग बंदी , भूतल पाणी व्यवस्थापन, पीक व्यवस्थापन या सात बिंदूंच्या आधारावर कार्य सुरू केले. त्यामुळे मृदा संवर्धन, पाणी संवर्धन साध्य झाले. गावात समृद्धी यायला लागली आणि या सोबतच गाव सोडून जाणारी कुटुंबे गावात पुन्हा येऊन नांदू लागली. कोविडच्या भयावह परिस्थितीत देखील उत्तम नियोजन करून 15 मे 2020 रोजी गाव कोविड मुक्त केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की हिरवे बाजारचे जे नाव आज भारतात आदर्श गाव म्हणून घेतले जाते. त्यासाठी सर्वांच्या हिताचा व सर्वांच्या कल्याणाचा विचार करूनच कार्य केले गेले आणि तशीच गरज आज भारतातील अनेक गावांसाठी आहे. सामाजिक आणि आर्थिक विषमता दूर झाली तरच भारताचे गणराज्यात रुपांतर होईल या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा देखील पुनरुच्चार त्यांनी केला. 27 नक्षत्र 12 राशी यांच्याशी सणांना जोडून उत्सव साजरे केले जायचे. परंतु आज आपली तरुणाई भरकटलेली आहे व्यसन ,पार्ट्या, राजकारण याकडे ओढावली गेली आहे. पूर्वी शिक्षणात संस्कार होते म्हणून माणुसकी व निसर्गाशी आपण जोडले गेले होते. आज विचारांना बदलण्याची गरज आहे जेणेकरून गावात आणि देशात आपोआप बदल घडतील. दारू हा राज्याच्या महसुलाचा मुख्य स्रोत होण्यापेक्षा कृषी हा मुख्यस्त्रोत झाला तरच आपण सामाजिक व आर्थिक गर्भश्रीमंतीकडे वाटचाल करू असे विवेचन त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांसमोर केले. राळेगणसिद्धी, हिरवेबाजार याप्रमाणे सर्व गावांचा कायापालट व्हावा असे स्वप्न आपण सर्वांनी उराशी बाळगले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना आणि आभार प्रदर्शन केंद्रीय मानवाधिकार संघटना नई दिल्ली चे राष्ट्रीय संघटन सचिव डॉ शिवचरण उज्जैनकर यांनी केले.तर सूत्रसंचालन केंद्रीय मानव अधिकार संघटना नईदिल्ली, जळगावशाखेचे जिल्हा सचिव प्रा. राजकुमार कांकरीया यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक जळगाव जिल्हाचे अध्यक्ष डॉ. अजय पाटील , उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री संजु भटकर सर मुंबई जिल्हाध्यक्ष श्री सुभाष कोळी, जळगाव तालुका अध्यक्ष श्री. किशोर पाटील, जळगाव तालुका उपाध्यक्ष सौ. ज्योती राणे, डॉ नयना झोपे, जळगाव तालुका सचिव श्री अजयकुमार पाटील, जळगाव जिल्हा सहसचिव डॉ. प्रशांत बडगुजर, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख श्री राजेश पोतदार उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख श्री भागवतसेठ राठोड महासचिव प्राचार्य जगदीश सूर्यवंशी जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख श्री ईश्वर महाजन सर सल्लागार श्री मधुकर पोतदार रावेर तालुका अध्यक्ष महेंद्र महाजन बुलढाणा जिल्ह्याचे सचिव श्री गजानन कऱ्हे, संपर्कप्रमुख प्रा. प्रवीण क्षिरसागर, बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष श्री अमितकुमार तायडे चिखली तालुका अध्यक्षा श्रीमती रेखा कस्तुरे, बुलढाणा जिल्हा कोषाध्यक्ष श्री सुनील मुंधोकार खामगाव तालुका कार्याध्यक्ष आदी सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आणि सहकार्य लाभले.






