Amalner

डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळून आल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.. अमळनेर न प चे आवाहन..

डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळून आल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी.. अमळनेर न प चे आवाहन..

अमळनेर शहरात सोहम नगर व विठठल नगर परिसरात दोन रुग्ण डेंग्यु सदयृश्य आढळुन असुन नगरपरिषद नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत आरोग्य सेविका, आरोग्य सेविका व आशा सेविका यांचेकडुन सदर भागात घरोघरी कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. त्यात एकुण २४२ घरांमधील साधारणतः १००० लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले त्यात एकुण २३ कंटेनर दुषीत आढळुन आले सदर दुषीत कंटेनर आरोग्य कर्मचारी मार्फत ताबडतोब रिकामे करण्यात आले.तसेच सदर परिसरात
नगरपरिषद स्वच्छता विभागामार्फत स्वच्छता मोहिम राबविण्यात येऊन परिसरात किटकनाशक पावडर टाकण्यात आले.

सध्या पावसाळयाचे दिवस असल्याने नागरिकांनी आपल्या घरांमधील पाण्याचे साठे झाकुण ठेवावे तसेच घरातील फ्रिज, कुलर,टायर, व कुंडयांमधील साचलेले पाणी साफ करुन स्वच्छता ठेवावी.घराच्या परिसरात असलेले पाण्याचे डबक्यांचे निमुर्लन करावे जेणेकरुन डासांची उत्पत्ती होणार नाही. असे आवाहन लोकनियुक्त अध्यक्षा जिजामाता कृषीभुषण सौ पुष्पलता साहेबराव पाटील, आरोग्य सभापती श्री घनश्याम पाटील व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे अमळनेर नगरपरिषद अमळनेर यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button