कातकरी समाजाचा विकास करणे शासनाचे आद्य कर्तव्य आहे :- महादेव पवार
पुणे : आपल्या महाराष्ट्र राज्यात डोंगर दऱ्या च्या भागात आदिवासी व आदीम जमातीची लोकसंख्या बऱ्याच प्रमाणात आढळून येते. यात महाराष्ट्र राज्यातील ४६ अनुसूचित जमाती पैकी ३ जमाती
नष्ट होन्याच्या मार्गावर आहेत.यापैकी पुणे जिल्ह्यातील कातकरी ,कोलम, आणि माडिया. या पैकी पुणे जिल्ह्यात पसरलेल्या खेड , आंबेगाव, जुन्नर, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हे आदी तालुक्यातील कातकरी समाजाची फार दयनीय अवस्था आहे कातकरी समाजातील दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा, बेरोजगारी, व्यसनाधीनता, बालविवाह, कागद पत्राचा आभाव, उदाहरणार्थ रेशनकार्ड,नाहीत जातीचे दाखले नाहीत (tribal certificate) मतदान नोंदणी नाही, आधारकार्ड, पॅनकार्ड आदी सरकारी कागदपत्रे अजूनही कातकरी समाजाकडे नसल्याने या कातकरी समाजाला घरकुल योजने पासून वंचित राहावे लागत आहे तरी कातकरी समाजाला घरकुल योजनेचा लाभ मिळणेसाठी त्यांना जागेचा (आठ अ)८अ देऊन शासनाने कातकरी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने स्वतः जातीने लक्ष घालून याचा विकास करावा लागेल असे येथील कुरण/ पानशेत ग्रुप ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते मा महादेव पवार व निसर्ग महिला बालकल्याण व कृषी विकास संस्थेचे संस्थापक मा हनुमंत कुंभारकर तसेच सामाजिक कार्यकर्ते सदाशिव कांबळे आदींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली






