आखाडा विधानसभेचा
ही खरी तुफान गर्दी.नुसती गर्दी नव्हे तर दादांचे दर्दी
गर्दी पाहूनच विरोधकांची फाटली
खऱ्या “रेकॉर्ड ब्रेक” जनतेच्या साक्षीने दमदार आमदार शिरिषदादा चौधरी यांचा नाम निर्देशन दाखल

अमळनेर
आज अमळनेर येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेरचे विद्यमान आमदार शिरिषदादा चौधरी यांनी लाखो जनतेच्या साक्षीने विधानसभा निवडणुकीचा नाम निर्देश अर्ज दाखल केला. भारतीय जनता पक्षाने रस्सीखेच स्पर्धेत विद्यमान आमदार यांनी केलेल्या विकास कामांना लक्षात घेऊन तिकीट जाहीर केले. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे सर्व विरोधक असलेल्या राजकीय व्यक्तिमत्वांना एकाच व्यासपीठावर आणण्यात त्यांना यश मिळाले. त्यांचा अर्ज दाखल करताना माजी आमदार साहेबराव पाटील,उदय वाघ इ आणि लाखोंच्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

नुकत्याच काँग्रेसच्या जुन्या नेत्या ऍड ललिता पाटील यांनी देखील भाजप मध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे या नंदसुपत्राचे बळ निश्चितपणे वाढले आहे.
दरम्यान माजी आमदार साहेबराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल पाटील यांच्या रॅलीतही सहभागी झाले होते. जनतेच्या मनात याबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
आथानी कैरी तथानी कैरी करता करता त्यांचे घड्याळाचे लोलक तर झाले नाही ना?असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.






