Aurangabad

स्टुडंट्स राईट असोशियनचे एमपीएससी परीक्षा घेण्याबाबत उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

स्टुडंट्स राईट असोशियनचे एमपीएससी परीक्षा घेण्याबाबत उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : मागील दोन अडीच वर्षापासून रखडलेल्या एमपीएससी परीक्षा व नियुक्त्या लवकरात लवकर देण्यात याव्यात यासंदर्भात आज सोमवार रोजी स्टुडन्ट राइट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार मॅडम यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कोविड 19, मराठा आरक्षण व इतर तांत्रिक बाबींमुळे मागील दोन ते तीन वर्षापासून एमपीएससीच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत. तसेच दोन वर्षापासून कोणत्याही परीक्षा घेण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक व मानसिक खच्चीकरण होत आहे.

परीक्षा लांबणीवर पडल्याने विद्यार्थ्यांचे वय ही वाढत आहे. इतर सर्व बाबी सुरू असताना एमपीएससी परीक्षा, पोलीस भरती, आरोग्य भरती का होत नाही? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. तसेच या परीक्षांची वयोमर्यादा वाढवून लवकरात लवकर सर्व परीक्षा घेण्यात याव्यात ता संदर्भात आदेश काढावा, अशी मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी धनराज सोनवणे, अजय शिंदे, चंद्रकांत कांबळे, सुरेश अधुडे, निवृत्ती भालकर आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button