?️ अमळनेर कट्टा…. जानवे येथे”कृषि दिन ” साजरा
अमळनेर : अमळनेर दिनांक १ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त*
जानवे येथील श्री.राजेंद्र फुला पाटील यांच्या कावपिम्पी रोडवरील शेतात, सकाळी १०,00 या, “ कृषि दिन ”
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
मा.श्री किशोर शिवाजीराव अहिरे माजी सभापती पं.स.अमळनेर
प्रमुख पाहुणे- १) मा श्रीमती रेखाताई नाटेश्वर पाटील, सदस्य पं.स.अमळनेर
२) मा.श्री.निवृत्ती पंजू बागुल,सदस्य पं.स.अमळनेर
प्रमुख पाहुणे
श्री.रावसाहेब पाटील आदर्श शेतकरी, श्री.मनोज पाटील उपसरपंच जानवे तसेच गटविकास
अधिकारी अमळनेर,तालुका कृषि अधिकारी अमळनेर, कृषि अधिकारी पंचायत समिती ,मंडळ कृषि अधिकारी,
विस्तार अधिकारी कृषि पंचायत समिती सामाजिक कार्यकर्ते, इतर शेतकरी बंधू व पं.स.अधिकारी कर्मचारी
उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषि अधिकारी श्री. भारत वारे यांनी कै. वसंतराव नाईक यांच्या कार्याचा
गुणगौरव विषद केला
श्री.संदीप वायाळ सहा.ग.वि.अ. पं.स,अमळनेर यांनी वृक्षलागवडीचे महत्व तसेच महात्मा गांधी रोजगार हमी
योजनेतून शेतकर्याना राबविता येवू शकणाऱ्या योजनाबाबत माहिती दिली.
श्री.किशोर पवार, कृषि सहाय्यक जानवे यांनी कापसावरील शेंदरी बोंड अळी व कापसाचे एकात्मिक अन्द्रवे
व्यवस्थापन यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
श्री.सुनील अहिरराव यांनी शेतकऱ्यांना जमीन सुपिकता निर्देशांकानुसार शेतकर्यानी पिकास राखताचे डोस
देऊन कमी खर्चात अधिक उत्पन्न घेण्याबाबत मार्गदर्शन केले.
शेतकरी बांधवांनी बी बियाणे , रासायनिक खते आणि औषधी अधिकृत परवाना धारक विक्रेत्याकडूनच पक्क्या
बिलासह खरेदी करावी तसेच छापील किमती पेक्षा जादा पैसे देवू नये जादा दराची मागणी केल्यास तक्रार करावी
बाजारात पुरेश्या प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध असून आवश्यक तेवढीच खते विकत घ्यावीत.पिकास संतुलित मात्रेत खताचा डोस द्यावा असे आवाहन श्री एम जे वर्मा कृषी अधिकारी पं. स.अमळनेर यांनी केले
शेतकऱ्यांना मोफत बाजरी व तीळ पिकाचे बियाणे मिनिकीट वाटप करण्यात आले.श्री अमोल भदाणे यांनी सूत्रसंचलन तर श्री आर.डी. सोनवणे यांनी आभार प्रदर्शन केले.






