Amalner

?️ अमळनेर कट्टा… भिलाली येथे मुलभुत सुविधा 2515 अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते संपन्न.

?️ अमळनेर कट्टा… भिलाली येथे मुलभुत सुविधा 2515 अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण भूमिपूजन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते संपन्न.

अमळनेर : मतदारसंघातील भिलाली येथे मुलभुत सुविधा 2515 अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, अंदाजित ७ लाख रुपये किंमतीच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामामुळे रस्त्याचे भाग्य उजळणार आहे.
राज्यातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.यासाठी लोकप्रतिनिधींकडून मुलभूत सुविधांसाठी निधीची मागणी होत असते. ही बाब विचारात घेऊन शासनाने लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा पुरवणे त्यासाठीही योजना 2515 ही योजना सुरू करण्यात आली आहे.यावेळी पं.स.उपसभापती अशोक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील,प्रा.सुरेश पाटील,संभाजी पाटील,राजु फाफोरेकर यांच्या सह आजी माजी सरपंच,उपसरपंच,ग्रा.पं.सदस्य, वि.का.सो.चे पदाधिकारी व ग्रामस्थ बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button