Aurangabad

?एक आवाहन..आणि निराधार, वयोवृद्ध आजीसाठी उभा राहिला निवारा

?एक आवाहन..आणि निराधार, वयोवृद्ध आजीसाठी उभा राहिला निवारा

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील नायगाव येथील एका निराधार व वयोवृद्ध आजींच्या निवाऱ्यासाठी प्रवाह परिवाराचे संस्थापक रामेश्वर गोर्डे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून आजीच्या निवाऱ्यासाठी मदतीचे आवाहन केले. या मदतीच्या आवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद देत आजीसाठी 17 हजार 702 रुपये मदत ही जमा झाली. त्याच मदतीच्या जोरावर नायगाव येथील या आजींच्या निवाऱ्यासह जीवनावश्यक वस्तूंचा देखील प्रश्न मार्गी लागला.

10 फुट लांब व 7 फुट रूंदीच्या पञ्याच्या शेड सह दैनंदिन घरगुती उपयुक्त वस्तूंसह किराणा मला आजींना दिले. हे सर्व काम पुर्ण झाल्यानंतर आजींचा आनंद गगनात मावणार नव्हता. एवढं सगळं साहित्य दिल्यानंतर आजी तर भारावून गेल्या.

खरचं हे काम करत असताना 5-6 दिवस खुप वेगळा आनंद मिळाला. हे सर्व काम आपल्या सर्वांच्या सहकार्याने शक्य झाले आहे. आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकून जी भरभरुन आर्थिक मदत केली. याच मदतीच्या जोरावर हे सर्व शक्य झाले आहे, असे रामेश्वर गोर्डे यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button