?️ अमळनेर कट्टा… परोपकाराय फलन्ति वृक्षा।
सर्वधर्मीय प्रार्थनास्थळच्या परिसरात केली वृक्षारोपणाची लागवड…
अमळनेर : अमळनेर येथील जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातील सर्व धर्म समभाव संदेश देणाऱ्या सर्वधर्मीय प्रार्थना स्थळी पर्यावरण समिती जळगाव जिल्हा सहसंघटक व साने गुरुजी नूतन हायस्कूलच्या उपक्रमशील शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या श्रीमती शारदा त्र्यंबक उंबरकर यांनी युवागट आणि माजी विद्यार्थी समावेत वृक्षारोपणाची केली लागवड.
याबाबत सविस्तर असे की कोरानामुळे आपली सर्वांची जी स्थिती झाली आहे. ती केवळ वृक्षांच्या अभावामुळे व पर्यावरणाच्या हासामुळे. हाहाकार आपण सर्वांनीच पाहिला आपल्यापैकी सगळ्यांचे कोणी ना कोणी हिरावून घेतले आहे कोणाला बेड
न मिळाल्यामुळे तर कोणाला ऑक्सिसजन न मिळाल्यामुळे जीवाला “मुकावे लागले यासाठीच पर्यावरण जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यावरण समिती जळगाव जिल्हा
सहसंघटक व साने गुरुजी नूतन हायस्कूलच्या उपक्रमशील शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या *श्रीमती शारदा त्र्यंबक उंबरकर* यांनी युवागट आणि माजी विद्यार्थी समावेत केले ६० वृक्षांची लागवड, पिंपळ, रेन ट्री,जांभूळ, बदाम, गुलमोहर, कडुलिंब,वड इ.जातीच्या झाडांची
लागवड ढेकू रोड वरील टेकडी, सर्वज्ञनगर कृष्ण मंदिर, धुळे रोड येथील साने गुरुजी विद्यालय, प्रबुद्ध कॉलनी बुद्ध विहार, बालेमिया दर्गा या धार्मिक प्रार्थना स्थळी वृक्षारोपण केली. तसेच श्रीकृष्ण मंदिराचे पूजारी मंदाराम चर्च बॅथेले चे फादर विशाल गावीत साने गुरुजी हायस्कूलचे सचिव संदिव घोरपडे, चेअरमन हेमकांत पाटील, माजी. जि. परिषद सदस्य शांताराम बापू पाटिल मुख्याध्यापक सुनिल पाटील व सर्व शिक्षक वृंद, बौद्ध विहाराचे सिद्धार्ध सोनवणे, बाले मियाचे मौलाना मुसाम गुलाब शेख यांना घेऊन वृक्ष लागवडीसाठी परिश्रम करणारे युवा गटातील सिंधू पाटील, सचिन पाटील, तसेच आजी. माजी विद्यार्थी सिद्धांत पाटील, रोहित पाटील, प्रेम भोंगळ, अमोल मालचे, यश पवार, सागर पवार, आर्यन बारस्कर, , प्रेम पाटील, हर्षवर्धन पाटिल, वैभव सोनवणे, पीयूष साळुंखे, तन्मय पाटील , केदार वाघ, जय मकवान, हर्षवर्धन पाटील, सुयोग पाटील, वैभव जाधव, मानस भवरे, वीराभवरे यांनी परिश्रम घेतले.






