Pune

इंदापूर नगरपरिषद अंतर्गत रमाई आवास योजनेस 94 लाभार्थ्यी पात्र ; प्रत्येकी मिळणार 2 लाख 50 हजार..

इंदापूर नगरपरिषद अंतर्गत रमाई आवास योजनेस 94 लाभार्थ्यी पात्र ; प्रत्येकी मिळणार 2 लाख 50 हजार..

दत्ता पारेकर पुणे

पुणे : इंदापूर नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात रमाई आवास योजने अंतर्गत 2020-21 साठी एकूण 94 लाभार्थ्यांच्या प्रस्तावास मान्यता मिळालेली असून समाज कल्याण विभाग जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्याकडून प्रति लाभार्थी 2 लाख 50 हजार प्रमाणे 2 कोटी 35 लक्ष रुपये रकमेचा धनादेश प्राप्त झाला असल्याची माहिती नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी दिली.

मागील तीन वर्षापासून लाभार्थ्यांचे प्रस्ताव मान्यतेसाठी समाजकल्याण विभागाकडे प्रलंबित होते. नगरपरिषदेच्या वतीने लाभार्थ्यांना घरे मिळावी म्हणून सतत पाठपुरावा सुरू होता. नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा,नगरसेविका सुवर्णा नितीन मखरे,नगरसेविका राजश्री अशोक मखरे व नगरपालिका अधिकारी यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

समाजकल्याण विभागाकडे एकूण 122 लाभार्थ्यांचे प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आले होते. त्यापैकी समाज कल्याण विभागाच्या समितीच्या पाहणीनुसार 94 लाभार्थी पात्र ठरले असून त्यांना अनुदान प्राप्त झालेले आहे. बांधकामाच्या प्रगतीनुसार लाभार्थ्यांना नगरपरिषद बांधकाम विभाग पाहणीनुसार टप्प्याटप्प्याने अनुदान वितरित करणार असल्याचे शहा यांनी सांगितले आहे.प्रलंबित असणारे प्रस्ताव यांतील त्रुटी दूर करून फेर प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button